चोराची पळता भुई थोडी केली, हेल्मेट आणि पैसे फेकत जीवाच्या आकांताने चोर पळत सुटला, नेमकं काय घडलं…

चोरांना चोरी केली, दीड लाखांची रक्कम लांबवली पण नागरिक मागे लागताच सगळं सोडून जिवाच्या आकांताने पळत सुटले, घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

चोराची पळता भुई थोडी केली, हेल्मेट आणि पैसे फेकत जीवाच्या आकांताने चोर पळत सुटला, नेमकं काय घडलं...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 15, 2023 | 7:32 AM

नाशिक : अनेकदा चोर चोरी करून पळून जाण्यात यशस्वी होतात. पण नाशिकच्या नाशिक रोड परिसरात चोराने चोरी केली पण पळून जात असतांना सतर्क नागरिकांमुळे पैसे आणि हातातील हेल्मेट फेकून, दुचाकी सोडून देण्याची वेळ आली आणि जिवाच्या आकांताने पळ काढावा लागला असा प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. खरंतर तब्बल दीड ते दोन तास पाळत ठेवत चोराने ही चोरी केल्याचे समोर आले आहे. पंचवटी येथून पैसे काढून थेट नाशिकरोड पर्यन्त जाई पर्यन्त चोराने पाठलाग करत चोरी केली होती. मात्र, सतर्क फेरीवाल्यांमुळे चोरीचा डाव उधळ्याने डाव फसला गेला आहे.

नाशिक महानगर पालिकेतील कर्मचारी योगेश सुरेश घेगडमल यांना खरेदी करायची होती. त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईकही येणार होते. त्याकरिता योगेश यांनी पंचवटी येथील बडोदा बँकेतून रक्कम काढली. काही रक्कम गाडीच्या डिक्कीत ठेवली तर काही रक्कम खिशात ठेवली.

त्यानंतर नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या समोर असलेल्या नित्यानंद ड्रेसेसजवळ त्यांनी दुचाकी लावली आणि त्यानंतर खरेदीसाठी ते मग्न झाले होते. पान त्यांचा पाठलाग करत चोरांनी पाठलाग करत पाळत ठेवली होती. पैसे ठेवतांना चोरांनी पहिले होते.

याचवेळी चोरांनी योगेश हे खरेदीत मग्न असल्याचे पाहून चोरीचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. महत्वाची बाब म्हणजे चोरांनी यावेळी पळणार तोच सतर्क फेरीवाल्यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी आरडा ओरड केली. आणि लागलीच नागरिकही चोरांच्या मागे पळू लागले.

आपल्या दुचाकी जवळ का गर्दी झाली म्हणून पाहण्यास गेलेले योगेश यांना लक्षात आले की आपल्या गाडीच्या डिक्कीतून पैसे चोरीला गेले. पण काही अंतरावरच चोरांनी दुचाकी सोडून दिली, पैसेही रस्त्यावर फेकले आणि हेल्मेट रस्त्यावर फेकून दिले. त्यामुळे चोरी यशस्वी झाली होती पण फेरीवाल्यांच्या सतर्कतेमुळे टळली.

खरंतर हा संपूर्ण प्रकार नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या समोरच घडला असून याप्रकरणी योगेश घेगडमल यांनी पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिली असून पोलिसांनी चोरांची दुचाकी ताब्यात घेतली असून अधिकचा तपास करत आहे. या घटनेतील आरोपीचे सीसीटीव्ही पोलिसांना प्राप्त झाले असून अधिकचा तपास सुरू आहे.