एकुलता एक मुलगा, डॉक्टर होण्याचं स्वप्न; बारावीत चांगले मार्क्स, पण त्याने घेतलेल्या निर्णयाने संपूर्ण गाव हादरलं

| Updated on: Mar 14, 2023 | 4:46 PM

नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एका तरुणांने केलेले एक कृत्य संपूर्ण गावाला हादरवून टाकणारं आहे, तरुणाच्या कृत्यानं कुटुंबाला मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

एकुलता एक मुलगा, डॉक्टर होण्याचं स्वप्न; बारावीत चांगले मार्क्स, पण त्याने घेतलेल्या निर्णयाने संपूर्ण गाव हादरलं
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : अलीकडच्या काळामध्ये नकारात्मकता पचवण्याची ताकद नसल्याने अनेकजण टोकाचा निर्णय घेताना दिसून येत आहे. यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अनेक विद्यार्थी ( Student News ) हे शाळेत हुशार असताना आणि चांगले मार्क्स मिळवत असताना देखील अशी काही कृत्य करताय ज्याने संपूर्ण कुटुंबासह गावाला धक्का बसतोय. एखाद्या गोष्टीत अपयश आलं तर ते पचवण्याची ताकद न ठेवता थेट टोकाचा निर्णय घेऊन आपला आयुष्य संपून टाकायचं असंच काहीसं तरुणाईच्या मनात येऊ लागलंय. अशीच एक घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील चिचोंडी गावात घडली आहेत. बारावीत अत्यंत चांगले मार्क्स मिळालेला, एकुलता एक मुलगा आणि नीटच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुणाने मोठा निर्णय घेतलाय.

सौरभ नवनाथ गायकवाड असं 18 वर्षीय महाविद्यालयीन तरूणाचे नाव आहे. अभ्यासाचा तणाव येत असल्याने त्याने आपलं आयुष्य संपवून टाकण्याचा निर्णय घेतलाय. सौरभच्या या कृत्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला असून संपूर्ण गाव हादरलं आहे.

सौरभ हा शांत मुलगा म्हणून परिचित होता. अत्यंत हुशार म्हणून त्याची गावात ओळख होती. तरीही त्याने टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपविल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. बारावीत त्याने चांगले गुण मिळविले होते म्हणून त्याचं संपूर्ण गावाने कौतुक केलं होतं.

हे सुद्धा वाचा

एकूणच सौरभच्या मृत्यूनंतर येवला पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. येवला पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात असला तरी शालेय वर्तुळात सौरभच्या कृत्याने खळबळ उडाली असून त्याचे शिक्षक हळहळ व्यक्त करत आहे.

पालकांचे लक्ष असतांनाही काही तरुण हे अपयश किंवा नाकारात्मकता पचवू शकत नाही. कुटुंबाचा कुठलाही विचार न करता असे कृत्य करत असल्याने हळहळ व्यक्त करण्यापलीकडे हाती काहीही लागत नाहीये. त्यामुळे कुटुंबातील संवाद हा अतिशय महत्वाचा असतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.