AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi MuMbai Crime : पनवेलजवळ ट्रकचालकाला मारहाण करून लुटले, दुकलीला अटक पण..

निर्जन रस्त्यावर लोकांना एकटं गाठून, त्यांना मारहाण करत पैसे लुटणाऱ्या टोळीचा हिसका एका इसमाला बसला. त्यांनी त्याचे पैसे, आधार कार्ड, लायसन्स पळवले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. मात्र त्यांचे उर्वरित दोन साथीदार अद्याप फरार आहेत.

Navi MuMbai Crime : पनवेलजवळ ट्रकचालकाला मारहाण करून लुटले, दुकलीला अटक पण..
| Updated on: Oct 06, 2023 | 11:57 AM
Share

रवी खरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पनवेल | 6 ऑक्टोबर 2023 : आडरस्त्याला लोकांच्या गाड्या थांबवून, त्यांना लुटणाऱ्या टोळीच्या अनेक गुन्ह्यांबद्दल आपण वाचलं असेल. सध्या शहरात गुन्ह्यांच्या (crime news) प्रकरणात वाढ होत असून, पनवेलजवळ एका ट्रकचालकाला अशाच पद्धतीने लुटण्यात (robbery) आले. मात्र सतर्क पोलिसांनी तत्काळ कारवाईला लागत, तपास करून या गुन्ह्यातील दोघांना अटक केली. उर्वरित दोघे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

असा घडला गुन्हा

कळंबोली येथील दयाशंकर जगदीश नारायण मिश्रा हे एम एच 46 ए एफ 9220 या गाडीवर चालक म्हणून काम करतात. पुण्यातील वाघोली, येथून ट्रक मध्ये माल भरून जेएनपीटी न्हावा शेवा येथे जाण्यास निघाले. प्रवासादरम्यान पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील जेएनपीटी पनवेल एक्झिट येथे त्यांनी गाडी थांबवली. फ्रेश होऊन ते परत आले आणि गाडीत बसतच होते न होते तोच मागून आलेल्या दोन इसमांनी त्यांना पटकन खेचले आणि रस्त्यावर खाली ढकलले. तेथे आधीच आणखी दोघे उभे होते.

चौघांच्या त्या टोळीने मिश्रा यांना एकटं पाहून मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच त्यांच्याकडे असलेली सात हजार रुपयांची रोख रक्कम, एक मोबाईल, तसेच त्यांचं आधार कार्ड आणि लायसन्स असा सर्व माल चोरट्यांनी ताब्यात घेतला आणि ते फरार झाले. मिश्रा यांनी आरडाओरडा करत मदत मागण्याचा प्रयत्न केला, पण मदतीसाठी कुणी यायच्या आतच चोरट्यांनी तेथून पचकन पोबारा केला.

हातात पैसे नाहीत, ना मोबाईल.. मारामुळे अंग ठणकतंय, तरीही अशा परिस्थितीमध्ये मिश्रा कसेबसे पोलिसांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी सर्व प्रकार कथन केला. त्यांच्या तक्रारीनंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली. अखेर या टोळीतील दोघा जणांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळाले. अविनाश धारपवार आणि मंगेश पवार अशी दोन आरोपींची नाव असून पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केली. मात्र त्यांचे उर्वरित दोन साथीदार अद्याप फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Follow Us
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट...
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट....
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....