अश्लील शेरेबाजी, रोजच पुरुषांची छेडछाड, अँटी रोमियो टीमने सापळा लावून पकडली लेडी गँग

Anti Romeo Squad nabs woman: स्त्रीयांच्या छेडछाडीचे, त्यांच्यावर अश्लील शेरेबाजीचे प्रकार अनेक ठिकाणी घडतात. त्याविरोधात समाजाचा आक्रोशही वेळोवेळी समोर येतो. पण या ठिकाणी उलट घडलं आहे. पुरूषांना छेडणारी लेडी गँग अंटी रोमियो पथकाने सापळा लावून पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अश्लील शेरेबाजी, रोजच पुरुषांची छेडछाड, अँटी रोमियो टीमने सापळा लावून पकडली लेडी गँग
| Updated on: Jul 26, 2026 | 4:23 PM

Anti Romeo Squad nabs woman: महिला ,तरुणींच्या छेडीछाडीचे प्रकार समोर येतात. त्यावर समाजाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतात. अनेक ठिकाणी महिला अशा मजनूंना चपलेचा प्रसादही देतात. पण इथं मात्र उलट घडलं आहे. पुरुषांची छेडछाड करणाऱ्या, त्यांच्यावर अश्लील शेरबाजी करणाऱ्या, त्यांना पाहून अश्लील हवाभाव करणाऱ्या महिलांनी पुरूषांचे जगणं मुश्किल केलं होतं. रोजच्या या छळाला कंटाळून काही जणं दुसर्‍या मार्गाने यायचे. पण तिथे सुद्धा महिला गँगची दहशत निर्माण झाली होती. काही पुरुषांनी या छळाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार केली. सापळा लावून पोलिसांनी ही लेडी गँग ताब्यात घेतली आहे.

लेडी गँगच्या दोघी ताब्यात

वाराणसीमध्ये अँटी रोमियो टीमने पुरूषांना नाही तर दोन महिलांना अटक केल्याने खळबळ उडाली. कारण या दोन महिला वारणसी पोलीस स्टेशन आणि मोक्याच्या ठिकाणी पुरूषांवर अश्लील शेरेबाजी करत होत्या. त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत होत्या. त्या पुरुषांना नाहक त्रास देत होत्या. जे पुरूष त्यांना समजावून सांगत, त्यांनाच त्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत. या त्रासाला कंटाळून काही पुरूषांनी त्यांची तक्रार केली. पोलिसांनी या लेडी गँगवर कारवाई केली. त्यावेळी दोन महिलांना पकडण्यात अँटी रोमियो टीमला यश आले. रोमियो टीमने महिलांना पकडल्याची जोरदार चर्चा होत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, लेडी गँगच्या दोन महिला सार्वजिनकरित्या पुरूषांवर अश्लील शेरेबाजी करत. त्यांची छेडछाड करत. त्या सार्वजनिक वातावरण खराब करत असल्याने तक्रार आली होती. वाराणसी पोलीस आयुक्तांनी या लेडी गँगचा शोध घेण्याचे निर्देश दिले. तेव्हा स्टेशन बाहेर दोन महिला अश्लील इशारे करताना पकडल्या गेल्या. या महिला रोज प्रवाशांना नाहक त्रास देत असल्याचे समोर आले. या महिलांविरोधात अनेक दुकानदारांनी, रिक्षा चालकांनी आणि इतर प्रवाशांनी पोलिसांना सूचना दिली होती.

इशारा केला नि पकडल्या गेल्या

त्या महिला तोंडाला ओढणी लावलेल्या होत्या. दोघींनी शर्ट आणि जिन्स घातलेली होती. त्या गर्दीचा फायदा घेत पुरूषांना टोमणे मारत, त्यांना मुद्दाम त्रास देत. अनेक पुरूषांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महिला पोलिसांनी शहरातील दोन ते तीन ठिकाणी सापळा लावला होता. वाराणशी स्टेशनबाहेर अशा महिला उभ्या असल्याचे समोर आले. पोलिसांना सूचना मिळताच. दोन महिलांना पकडण्यात आले. काहींनी त्यांची ओळख पटवण्यास मदत केली. तक्रारीनंतर आता त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. या महिलांच्या इतर साथीदार असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. पण त्यांना कारवाईचा संशय आल्याने त्या गायब झाल्याचे मानले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us