पारनेरच्या एटीएम चोरीमधील म्होरक्या, बनावट नोटा छापण्यात मास्टरमाईंड, पोलिसांकडून 24 तासांत बेड्या

| Updated on: Sep 04, 2021 | 2:56 PM

विकास रोकडे हा बनावट नोटा छापत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आज (ता. तीन) पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी झडती घेतली. नोटा छापण्याचे साहित्य पोलिसांनी तेथून ताब्यात घेतले आहे.

पारनेरच्या एटीएम चोरीमधील म्होरक्या, बनावट नोटा छापण्यात मास्टरमाईंड, पोलिसांकडून 24 तासांत बेड्या
आरोपी विकास रोकडे यापा पोलिसांनी अटक केलीय.
Follow us on

अहमदनगर : काही दिवसांपूर्वी तीन चोरट्यांनी टाकळी ढोकेश्वर येथील एटीएम मशिन चोरण्याचा प्रयत्न केला होता. तीन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत अटकही केली. त्यांतील एक आरोपी विकास रोकडे हा बनावट नोटा छापत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आज (ता. तीन) पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी झडती घेतली. नोटा छापण्याचे साहित्य पोलिसांनी तेथून ताब्यात घेतले आहे.

बनावट नोटा छापत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला

सविस्तर वृत्त असं, मागील आठवड्यात टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँकेचे एटीएम मशिन चोरण्याचा प्रयत्न तीन चोरट्यांनी केला होता. ते चोरटे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत जेरबंद केले होते. त्यांतील एक आरोपी विकास रोकडे (वय 19, रा. वडगाव सावताळ) हा बनावट नोटा छापत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता.

सध्या एटीएम चोरीचा तपास सुरू असताना तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक हनुमान उगले यांनी आरोपीच्या वडगाव सावताळ येथील घराची झडती घेतली. त्या वेळी रोकडेच्या घरात पाचशे व शंभर रुपयांच्या बनावट चलनी नोटा सापडल्या, तसेच रंग, छपाई यंत्र व कागद, कटर, कात्री आदी साहित्य मिळून आले. हे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. नोटा छापण्याच्या कामात त्याचे आणखी कोण साथीदार आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.

कुणाची फसवणूक झाली असेल तर पोलिस स्टेशनशी संपर्क साधा

आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने, त्याने छापलेल्या नोटा कोठे दिल्या, याची विचारपूसही पोलिसांनी सुरू केली आहे. कोणाची बनावट चलनी नोटांद्वारे फसवणूक झाली असेल, तर संबंधितांनी पारनेर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिस निरीक्षक घनशाम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली. उपनिरीक्षक उगले तपास करीत आहेत.

नगरमध्ये आजारपणाला कंटाळून विवाहितेची चिमुकलीसह आत्महत्या

आजारपणाला कंटाळून विवाहितेने चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना श्रीरामपूरमध्ये उघडकीस आली आहे. श्रीरामपूरच्या टाकळीमियात ही घटना घडलीय. मायलेकीच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आजारपणाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

विद्या दिलीप कडु (वय 25) आणि सिध्दी दिलीप कडु (वय 4) असे आत्महत्या केलेल्या मायलेकीचे नाव आहे. विद्या ही शाळेत असल्यापासून थोडीशी मनोरुग्ण होती. तिला तेव्हापासून औषधोपचार चालु होते.

विद्याची श्रीरामपूर येथील दवाखान्यात मासिक ट्रिटमेंट चालू होती. या आजारामुळे ती सुमारे तीन वर्षापासून टाकळीमिया येथे माहेरी राहत होती. विद्या ही या औषधोपचार आणि इंजेक्शनला पूर्णपणे वैतागली होती. तिने संधी साधून आपल्या लहान चिमुकलीला घेऊन जवळच असलेल्या विहीरीत उडी घेत आत्महत्या केलीय.

(Parner ATM theft mastermind, main Accussed in printing counterfeit notes, handcuffed by nagar police in 24 hours)

हे ही वाचा :

थ्री स्टार हॉटेलमध्ये आठ महिने राहिला, दोन सुपर डीलक्स रुममध्ये ऐशोआरामात वावरला, 25 लाखांचं बिल भरण्याची वेळ येताच…

Aurangabad Crime: ‘यासाठी दामलेच जबाबदार’ म्हणत मारहाण झालेल्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, भाजप-शिवसेना भिडले, पुंडलिकनगर बनले गुंडलोक नगर

सुपारी देणारी आणि घेणारे दोघेही फसले, सांगली पोलिसांनी पुण्यात येऊन ‘सुपारीबहाद्दरांना’ बेड्या ठोकल्या