Aurangabad Crime: ‘यासाठी दामलेच जबाबदार’ म्हणत मारहाण झालेल्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, भाजप-शिवसेना भिडले, पुंडलिकनगर बनले गुंडलोक नगर

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 04, 2021 | 2:02 PM

3 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता तक्ररदार भाडेकरू महिलेने बदनामी झाल्याने फिनेल प्राशन केले. त्यानंतर दामलेच्या पत्नीनेही सकाळी 10 वाजता विष प्राशन केले.

Aurangabad Crime: 'यासाठी दामलेच जबाबदार' म्हणत मारहाण झालेल्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, भाजप-शिवसेना भिडले, पुंडलिकनगर बनले गुंडलोक नगर
बदनामीच्या भीतीपोटी औरंबादेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद: काही दिवसांपूर्वी हनुमान नगर येथील भाजपचा जिल्हा सचिव अशोक दामले (Ashok Damle) व त्याच्या पत्नीने शेजारच्या महिलेवर अश्लील वर्तणुकीचा आरोप करत तिला मारहाण केली होती. या प्रकरणी दामलेवर पुंडलिक नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याने सदर महिले विरोधात सोशल मीडियात बदनामीकारक मजकूर प्रसारीत केला. ही बदनामी सहन न झाल्याने माझ्या आत्महत्येसाठी दामलेच जबाबदार आहे, असे म्हणत संबंधित महिलेने शुक्रवारी सकाळी फिनेल प्राशन केले. त्यानंतर काही वेळातच भाजप जिल्हा सचिवांच्या पत्नीनेही विषारी द्रव प्राशन केले. या दोघींवरही घाटी रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन्ही महिलांची प्रकृती स्थिर

या घटनेतील दोन्ही महिलांची प्रकृती स्थिर असून पोलिसांनी दोघींचेही जबाब नोंदवले आहेत. दामलेच्या पत्नीला आत्महत्येचे कारण विचारले असता, शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या पतीला म्हणजेच दामलेला खोट्या गुन्ह्यात अडकवत असल्याचा प्रकार सहन न झाल्याने आत्महत्या केल्याचे कारण सांगितले. या दोन्ही प्रकरणी, नियमानुसार, कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिली.

काय आहे नेमके प्रकरण?

29 ऑगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजता भाडेकरू महिला अश्लील वर्तणूक करते, असा आरोप करत भाजपचा जिल्हा सचिव अशोक दामले व त्याच्या पत्नीने सदर महिलेला मारहाण केली. याविरोधात महिलेने दुपारी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळताच दामलेसह या भागातील 28 नागरिकांनी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेणारा अर्ज त्याच दिवशी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पोलिस ठाण्यात दिला. 30 ऑगस्ट रोजी महिलेच्या तक्रारीवरून दामले दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल झाला. 31 ऑगस्ट रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दामलेच्या विरोधात महिलेची बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याचवेळी भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी दामले याच्या बाजूने धावल्या. पुंडलिक नगर पोलिस ठाण्यासमोरच जोरदार वादावादी झाली. 3 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता तक्ररदार भाडेकरू महिलेने बदनामी झाल्याने फिनेल प्राशन केले. त्यानंतर दामलेच्या पत्नीनेही सकाळी 10 वाजता विष प्राशन केले.

सोशल पोलिसिंगमुळे पुंडलिक नगर बनले गुंडलोक नगर…

एकेकाळी कामगार वस्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुंडलिक नगरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमामावर गुंडगिरी वाढली आहे. दर पंधरा दिवसांनी येथे हाणामारी, हत्या झाल्याच्या बातम्या येत असतात. गेल्या महिन्यात एक गुंड कारवर मैत्रिणीसोबत नाचत असतानाचा व्हिडिओ समोर आला होता. तसेच एका व्यक्तीचा खून करून त्याच्या तोंडावर लघवी केल्याचीही विकृत घटना घडली होती. याविषयी सामाजिक व राजकीय अभ्यासकांना विचारले असता, ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी म्हणाले, ‘पुंडलिक नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल पोलिसिंग वाढले आहे. गुंडांना विश्वासात घेऊन, त्यांच्यात मानसिक परिवर्तन घडवून गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र या प्रयोगाचे दुष्परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत’. पोलिसांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत येथील गुन्हेगार सोकावत आहेत, पोलिसांनी त्यांचा पोलिसी खाक्या दाखवला तर या घटनेत संधी साधणारे राजकीय पक्षही मागे हटतील, असे जाणकारांचे मत आहे. (Two Suicide attempt and BJP Vs Shiv Sena in Pundlik nagar, Aurangabad, Maharashtra)

इतर बातम्या- 

Aurangabad Crime: 60 किमीचा फिल्मी स्टाइल थरार, ट्रायल म्हणून कार पळवणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

Aurangabad Crime : ‘त्या’ खवले मांजर चोरांचा जामीन नाकारला, हर्सूल कारागृहात रवानगी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI