Dombivli Crime : मॉर्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांना चाकूच्या धाकाने लुटलं, मोबाईल पळवणाऱ्या आरोपीला लोकांनी धू धू धुतलं..

सकाळी उठून मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचे प्रमाण बरेच आहे. मात्र आता सकाळी फिरणे देखील सुरक्षित राहिलं नसल्याचं समोर आलं आहे. मॉनर्निंग वॉकला निघालेल्या लोकांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे.

Dombivli Crime : मॉर्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांना चाकूच्या धाकाने लुटलं, मोबाईल पळवणाऱ्या आरोपीला लोकांनी धू धू धुतलं..
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 12:07 PM

सकाळी उठून मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचे प्रमाण बरेच आहे. मात्र आता सकाळी फिरणे देखील सुरक्षित राहिलं नसल्याचं समोर आलं आहे. मॉनर्निंग वॉकला निघालेल्या लोकांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. डोंबिलतील एमआयडीसी परिसरात ही खळबळजनक घटना घडली असून सतर्क नागरिकांनी त्या चोराला पकडून चांगला चोप दिला. मात्य या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी त्या चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले. पळून गेलेल्या दुसऱ्या चोरट्याचा तपास सुरू आहे.

मॉर्निंग वॉकही आता असुरक्षित ?

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात सकाळच्या वेळेस अनेक लोक फिरायला. चालायला येतात. मात्र अशा फिरायला आलेल्या लोकांना हेरून, त्यातील एकट्या दुकट्या त्या प्रवाशांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवत त्यांचा मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यांचा सध्या सुळसुळाट झाला आहे. अशाचा काही लोकांना थांबवून त्यांचा मोबाईल हिसावणाऱ्या चोरट्यांना शहरातील सतर्क नागरिकांनी पकडलं आणि बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास एमआयडीसीमध्ये ही घटना घडली.

एमआयडीसी परिसरातील रस्त्यावर संशयितरित्या फिरणाऱ्या दोन चोरट्यांनी एका नागरिकाला थांबवून त्याच्याशी बोलण्याचा नाटक केले. आणि त्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या नागरिकांनी वेळीच मदतीसाठी धाव घेत त्यांना पकडले. तरीही एक चोरटा त्यांच्या हातातून निसटून पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र दुसऱ्याला पकडून नागिरकांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे चॉपर सापडला. ते पाहून नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला आणि मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू अ,ून तपासत करण्यात येत असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.