
जळगाव : एकीशी साखरपुडा, दुसरीशी तोतयेगिरी करुन तिसरीशी संसार थाटून तिच्याशी जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवल्याशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका तोतया प्राध्यापकासह त्याला सहकार्य करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Police Case has been registered against fake professor in jalgaon)
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या महिलेचा औरंगाबाद येथील पियुष हरिदास बावस्कर याच्याशी विवाह झाला. हा मुलगा कॉलेज ऑफ इंजिनियरींग औरंगाबाद येथे कायमस्वरूपी प्राध्यापक आहे, असे सांगण्यात आले. लग्न करुन सासरी आल्यानंतर तिला सर्व सत्य परिस्थिती समजली. तिचा नवरा दररोज शिवीगाळ करत असे. दारुच्या नशेत जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवण्यास सांगतं.
या घटनेनंतर त्या महिलेने तिच्या आई वडिलांना सासरी बोलवून घेतले. तिने आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला. यानंतर त्या महिलेने याविरोधात तक्रार केली आहे.
या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, माझे लग्न एक महिन्यापूर्वी झाले. हा मुलगा चांगला असून निर्व्यसनी आहे, असे मला सांगण्यात आले. पण मी सासरी गेल्यावर तो रोज दारु पिऊन मला मारहाण करतो. तसेच घरातून पैसे आणण्यासाठी सांगतो. मला जबरदस्तीने दारु सिगारेट पाजायचा. तसेच मला अनैसर्गिक संबंध करायला जबरदस्ती करायचा.
विशेष म्हणजे पियुष याने लग्नाआधी बँकेतून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणं. यासाठी तिला मारहाण करण्यात येत होती, असे नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे लग्न जमविण्याआधी मुलीच्या वडिलांनी पियुष खरचं कायमस्वरुपी नोकरीला आहे का? याची चौकशी केली होती. त्यावेळी संस्थेच्या चेअरमनशी भेट घेतली असता, त्यांनी कायमस्वरुपी नोकरीला असल्याचे सांगितले होते. लग्न जमविण्यासाठी पियुष माझ्या संस्थेत नोकरीला असल्याचे खोटे सांगितले.
याप्रकरणी चेअरमनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पियुष हरिदास बावस्कर या तोतया प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला सहकार्य करणाऱ्या त्याचे वडील हरिदास खंडू बावस्कर, सासू वासंती बावस्कर आणि चुलत सासरे शंकर खंडू बावस्कर यांच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अद्याप अटक नाही
सध्या पीडित मुलीसह तिचे कुटुंब न्यायासाठी पोलीस ठाण्यात फेऱ्या मारत आहेत.पण अद्याप आरोपीस अटक करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे पोलीस तपासात पियुषचे अजून महिलांशी संबंध असल्याचे निदर्शनास आले आहे. (Police Case has been registered against fake professor in jalgaon)
संबंधित बातम्या :
जावळी-महाबळेश्वरात ‘क्रेटा’मधून हवा, फिल्मी स्टाईल पाठलाग करुन गजा मारणेला सातारा पोलिसांच्या बेड्या
कार्यक्रमात ब्रँडेड कुंकू का वापरले नाही, क्षुल्लक कारणामुळे नवऱ्याकडून चक्क लग्नाला नकार
‘माझ्यावर वारंवार बलात्कार’, अभिनेत्रीचा गंभीर आरोप, मुंबई पोलिसांकडे तक्रार