Psycho Killer : लग्नाआधी ती… सायको किलर पूनमबद्दल आईचा मोठा खुलासा

पानिपतमध्ये पकडण्यात आलेली सायको किलर पूनमच्या बाबतीत, तिची आई सुनीता देवी या पुढे येऊन बोलल्या आहेत. 4 मुलांचा जीव घेणाऱ्या, आपल्याच मुलीबद्दल त्यांनी मोठा खुलासा केला आहे. काय म्हणाल्या त्या ?

Psycho Killer : लग्नाआधी ती... सायको किलर पूनमबद्दल आईचा मोठा खुलासा
सायको किलरबद्दल आईचा मोठा खुलासा
Updated on: Dec 05, 2025 | 9:00 AM

हरियाणातील पानीपत येथे घडलेल्या हत्याकांडानंतर सायको किलर पून ही देशभरात चर्चेता विषय ठरली. पोटच्या मुलसाह तीन लहान निष्पाप मुलांचा जीव घेणाऱ्या पूमनचं कांड ऐकून कोणाच्याही अंगावर काटाच येईल. गेल्या 2 वर्षात तिने चार लहान मुलाचा जीव घेतला, त्यात तिच्या सख्ख्या मुलाचाही समावेश होता. 1 डिसेंबरला तिने चौथा खून केला आणि ती तिथेच अडकली. अखेर तिच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी तिला अटक केली. याच सायको किलर पूनमच्या केसमध्ये एक नवी अपडेट समोर आली आहे.

याप्रकरणात पहिल्यांदाच पूनमची आई समोर आली असून तिने लेकीबद्दल मोठा खुलासा केला आहे. लग्नापूर्वी माझी मुलगी पूनम अगदी सामान्य होती, तेव्हापर्यंत ती असं कधीच वागली नव्हती, असं पूनमच्या आईचं म्हणणं आहे. एकंदरीतच तिचा स्वभाव खूप शांत होता. घरात, गावांत किंवा नातेवाईकांमध्येही , कधीच कोणी पूनमची तक्रार केली नाही. पूनमला जर काही मानसिक त्रास असता, तर आम्ही तिच्यावर उपचार केलेच असते ना. पण लग्नाआधी अशी काहीच लक्षणं दिसली नाहीत. तुम्ही कोणालाही विचारू शकता, तिने लग्नाआधी कोणत्याही मुलांना, कधीच त्रास वगैरे दिलेला नाही, असं पूनमच्या आईने सांगितलं.

कुणाला म्हणाली दूध सांडलं, कुणाला म्हणाली पीरियड्स आले… ती चूक झाली नसती तर सायको पूनम कधीच…

सायको किलर पूनमच्या आईचं स्पष्टीकरण

सायको किलर पूनमची आई सुनीता यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांच्या मुलीसोबत जे काही घडले ते लग्नानंतर झालं. जर पूनम अशी होती तर तिने लग्नाआधी मुलांना का मारले नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझ्या मुलीमध्ये हे बदल लग्नानंतर झाले असतील, कारण आधी ती पूर्णपणे ठीक होती, असा दावाही तिच्या आईने केला.

पूनमने खरोखर या हत्या, हे गुन्हे केले असतील तर ती वाचणार नाही, तिला शिक्षा मिळेलच. जर माझ्या मुलीने हे सगळं (हत्या) केलं असेल तर तिला शिक्षा भोगावीच लागेल. तिने जे चुकीचं केलं, त्याला आम्ही कधीच योग्य म्हणणार नाही, असंही त्यांना सांगितलंय

पण तिने असं का केलं असावं हेच आम्हाला समजू शकत नाहीये, माझ्या मुलीने हे पाऊल का उचललं, ते आकलनापलीकडचं आहे. आमच्यासाठी, कुटुंबासाठी हा खूपच मोठा धक्का आहे असं तिची आई म्हणाली. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.