Pune Crime | धक्कादायक! पुण्याला हादरवून सोडणारी घटना, पतीसमोर पत्नीवर बलात्कार

Pune Crime | गंभीर बाब म्हणजे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. विद्येच माहेर घर असलेल्या पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात मागच्या काही दिवसात महिलांविरोधात अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत.

Pune Crime | धक्कादायक! पुण्याला हादरवून सोडणारी घटना, पतीसमोर पत्नीवर बलात्कार
Pune police
| Edited By: | Updated on: Jul 26, 2023 | 3:21 PM

पुणे : महिलांविरोधात घडणारे गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे बनवण्यात आले आहेत. पण अजूनही महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. विद्येच माहेर घर असलेल्या पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात घडलेली ही घटना सर्वांनाच हादरवून सोडणारी आहे. पुण्यात एका खासगी सावकाराने पती समोरच पत्नीवर बलात्कार केला. कर्जाची परतफेड करता आली नाही, म्हणून त्याने कर्ज घेणाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केला.

पुण्यातील हडपसर येथे फेब्रुवारी 2023 मध्ये ही घटना घडली होती. मात्र काल तक्रार दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.

आरोपीने कर्ज दिलं होतं

पीडित विवाहित महिलेने या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणात आरोपी इम्तियाज हसीन शेख याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने कर्ज दिलं होतं. कर्जाचे हे पैसे फिर्यादीचा पती परत करू शकला नाही.

पती का वाचवण्यासाठी आला नाही?

आरोपी सावकाराने फिर्यादी आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली होती. आरोपींने दोघांना भेटायला बोलवलं व पती समोरच पत्नीवर बलात्कार केला. फिर्यादीचा पती तिला वाचवण्यासाठी येईल म्हणून आरोपीने त्याला चाकूचा धाक दाखवला. जेणेकरुन त्याला जागेवरुन हलता आलं नाही.

सोशल मीडियावर व्हायरल

फिर्यादीच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी देत फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.