AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तातडीचा निर्णय, मोठी खुशखबर, पुण्यात विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफ, मेस दरवाढीबाबतही महत्त्वाचे पाऊल; काय लाभ मिळणार?

Pune University Mess Fee: दुष्काळ परिस्थितीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रस्तावित मेस दरवाढ रद्द करण्यात आली आहे. परीक्षा शुल्कही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तातडीचा निर्णय, मोठी खुशखबर, पुण्यात विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफ, मेस दरवाढीबाबतही महत्त्वाचे पाऊल; काय लाभ मिळणार?
| Updated on: Sep 28, 2026 | 3:49 PM
Share

राज्यातील अनेक भागात दुष्काळ असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतात या दुष्काळाच्या झळा त्यांनाही पोहोचत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या मेसमध्ये दहा रुपयांनी दरवाढ करण्याचा प्रस्तावित निर्णय घेण्यात आलेला होता. मात्र यावर आता मोठी अपडेट समोर आली आहे.

दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मेस दरवाढ करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. यानंतर हा निर्णय आमच्यासाठी दिलासादायक आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे परीक्षा शुल्कही माफ करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी केलेल्या आक्षेपांनंतर आणि महाराष्ट्रातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (एसपीपीयू) मेस आणि भोजनगृहाच्या दरात प्रस्तावित १० रुपयांची दरवाढ स्थगित केली आहे. विद्यापीठाने अन्नाची गुणवत्ता आणि भोजन-संबंधित समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले आहे.

१७ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार भोजनगृहाच्या दरांमध्ये केलेल्या बदलांवर विद्यार्थी आणि विविध संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर २६ सप्टेंबर रोजी झालेल्या एसपीपीयू व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता मेसच्या दरात प्रस्तावित वाढ पुढील महिन्यापासून लागू केली जाणार नाही आणि ती स्थगित राहील. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त आर्थिक भार टाळणे, हा या निर्णयाचा उद्देश आहे.

Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप