AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! सोशल मीडिया अकाउंटबाबत सुप्रीम कोर्टाचे मोठे आदेश, आता या लोकांना…

सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारला सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांची भारतीय कायद्यानुसार प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार, १८ वर्षांखालील मुलांना पालकांच्या संमतीने व देखरेखीखालीच सोशल मीडिया अकाउंट तयार करता येणार आहेत, अन्यथा पूर्णपणे बंदी येऊ शकते.

सर्वात मोठी बातमी ! सोशल मीडिया अकाउंटबाबत सुप्रीम कोर्टाचे मोठे आदेश, आता या लोकांना...
supreme courtImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 3:45 PM
Share

सोशल मीडियावर अकाउंट बनवण्याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर करण्याबाबत मोठी पावलं उचला, असे आदेशच कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. सोशल मीडिया कंपन्यांकडून अल्पवयीन मुलांच्या खात्यांबाबत असलेली सध्याची व्यवस्था केवळ मार्गदर्शक तत्त्वांपुरती मर्यादित न ठेवता, ती भारतीय कायद्यानुसार प्रभावीपणे लागू करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. कोर्टाच्या या स्पष्ट आदेशामुळे अल्पवयीन मुलांना आता सोशल मीडियावर अकाउंट बनवता येणार नाहीये.

18 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट बनवता येणार नाही. पालकांच्या देखरेखीखाली वयोमर्यादा निश्चित करा आणि त्यानंतरच त्यांना अकाउंट बनवण्याची परवागनी द्या, असे आदेशच सोशल मीडिया कंपन्यांना भारतीय कायद्यानुसार जारी करा, असं कोर्टाने केंद्र म्हटलं आहे. सध्या इंटरमीडिएटरी नियमानुसार हे सांगण्यात आलं आहे, मात्र तात्कालीन प्रभावाने ही व्यवस्था निश्चित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

याचिकेतील मागणी काय?

सर्वोच्च न्यायालयात जस्ट राइट्स ऑफ चिल्ड्रेन अलान्सच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. यावेळी अल्पवयीन मुलांचा सोशल मीडियाचा वापर आणि सुरक्षेचे उपाय यावर चर्चा करण्यात आली. याबाबत याचिकाकर्त्यांचे वकील एचएस फुल्का यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. 18 वर्षाखालील मुलं स्वतंत्रपणे कोणत्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रवेश करत नाहीत. मात्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नियम आणि अटी मान्य करून अकाउंट बनवतात, असं फुल्का यांनी कोर्टाला सांगितलं.

पालकांच्या निगराणीत…

18 वर्षाखालील मुलांना स्वतंत्रपणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसोबत कॉन्ट्रॅक्ट करण्याच्या व्यवस्थेवर बंदी घालण्याच्या व्यवस्थेला इंटरमीडिअरी रुल्सनुसार, वैधानिक रुप देण्याचा विचार करावा, असं कोर्टाने केंद्राला सूचवलं आहे. याचिकेत एक महत्त्वाची मागणी करण्यात आली होती. 18 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर अकाऊंट उघडण्यास पूर्णपणे बंदी घालण्याऐवजी त्यांना पालक किंवा आईवडिलांच्या सहमतीने आणि त्यांच्या देखरीत सोशल मीडिया अकाउंट तयार करण्याची परवानगी देण्यता यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे.

सध्या काय परिस्थिती?

सध्याच्या इंटरमीडिअरी नियमानुसार, सोशल मीडिया आणि डीजिटल प्लॅटफॉर्मसाठी असंख्य नियम आहेत. पण अल्पवयीन मुलांना अकाउंट बनवण्यापासून रोखण्यासाठी कोणतीही प्रभावी आणि समान ऐज व्हेरिफिकेशनची व्यवस्था नाहीये, असं याचिकेत म्हटलंय. कोर्टाने यापूर्वीही अल्पवयीन मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेवरून निर्देश देण्यावर जोर दिला होता. सप्टेंबरमध्ये सुनावणी करताना कोर्टाने भारतात याबाबत सुरक्षेचे उपाय असले पाहिजे, असं म्हटलं होतं.

Follow Us
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...