Pune Crime News : गर्लफ्रेंडमुळे रावण टोळीचा गुंड पोलिसांच्या ताब्यात, इन्स्टाग्राम वरून…

Pune News : एखाद्या गुन्ह्यात आरोपीला कसं पकडायचा हे पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. मागच्या काही दिवसांपासून पोलिसांनी गुंगारा देणाऱ्या रावण टोळीच्या गुंडाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Pune Crime News : गर्लफ्रेंडमुळे रावण टोळीचा गुंड पोलिसांच्या ताब्यात, इन्स्टाग्राम वरून...
chikhali police station
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 04, 2023 | 10:25 AM

रणजित जाधव, पुणे : रावण टोळीतील (rawan group pune) एका गुंडाने एकाची हत्या केल्यानंतर पुण्यातून पळ काढला होता. तो काही महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देतोय. पोलिस त्याच्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून होते. मे महिन्यात गुंडाने तरुणाची हत्या केल्यापासून तो गायब होता. पोलिसांनी (pune police) सोशल मीडियापासून त्याच्या बँक खात्यावर सुध्दा लक्ष ठेवलं होतं. त्याचबरोबर तो कोणाशी तरी संपर्क साधेल अशी त्यांना शंका होती. शेवटी त्याला चिखली पोलिसांनी गुजरात (gujrat state) राज्यातून अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येणार असून या प्रकरणात अनेकजण अडकण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

चिखलीमध्ये मे महिन्यात तरुणाची हत्या करून पसार झालेल्या रावण टोळीच्या गुंडाला चिखली पोलिसांनी गुजरातच्या वडोदरा मधून अटक केली आहे. पोलिसांनी रावण टोळीतील गुंडांनी अनेक गुन्हे केल्यामुळे त्यांच्या मोक्का लावला आहे. कपिल उर्फ विनय दीपक लोखंडे असं त्या गुंडांचं नाव आहे. त्याला ताब्यात घेतल्यापासून इतर गुंड चांगलेचं घाबरले आहेत.

कपिल उर्फ विनय दीपक लोखंडे या कुख्यात गुंडाने त्याच्या साथीदारांसह 22 मे ला तरुणाची हत्या केली. तेव्हापासून देशात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरत होता. त्याचबरोबर पोलिसांना चकवा सुध्दा देत होता.

काही दिवसांपूर्वी लोखंडे याने इन्स्टाग्राम वरून त्याच्या मैत्रिणी बरोबर संपर्क साधला. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मैत्रीणीची कसून चौकशी केली. त्यावेळी विनय लोखंडे हा गुजरात राज्यातील वडोदर येथे असल्याचं पोलिसांना समजलं. तिथं पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.