AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Panshet Crime : पानशेतमध्ये दगडाने ठेचून आदिवासी तरुणाचा खून, पाच हल्लेखोरांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

Panshet Murder Case : पुण्याच्या पानशेतमध्ये दगडाने ठेचून युवकाचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वर्दळ असलेल्या पानशेत येथील दाट लोकवस्तीच्या रस्त्यावर लाथा बुक्या आणि दगडाने ठेचून युवकाचा निर्घृण खून करण्यात आला.

Panshet Crime : पानशेतमध्ये दगडाने ठेचून आदिवासी तरुणाचा खून, पाच हल्लेखोरांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
आदिवासी तरुणाचा निर्घृण खूनImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 17, 2025 | 10:53 AM
Share

पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची वर्दळ असलेल्या पुण्यातील पानशेत येथील दाट लोकवस्तीच्या रस्त्यावर आदिवासी तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. लाथा बुक्यांनी मारहाण आणि दगडाने ठेचून आदिवासी कातकरी समाजाच्या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. घटनेनंतर दुचाकीवरून आलेले सर्व हल्लेखोर फरार झाले. रोहिदास काळुराम काटकर ( वय २४, रा.कादवे, ता. राजगड) असे मयत युवकाचे नाव आहे‌. या घटनेमुळे पानशेत वरसगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आदिवासी कातकरी समाजावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी पाच अज्ञात हल्लेखोरां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप खूनाचे कारण स्पष्ट झाले नाही.

रविवारी रात्री आले हल्लेखोर

हा प्रकार काल रविवारी (१५ ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पानशेत येथे नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेल समोर घडला. मयत रोहिदास काळुराम काटकर आणि मोसे (ता. राजगड) येथील विजय पांडुरंग जाधव हे दोघे जण पानशेत येथे नंदाबाई कुंभार यांच्या हाँटेल समोर उभे होते ‌‌ . त्यावेळी मोटरसायकलवरुन आलेले 20 ते 25 वयोगटातील पाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अचानक लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मयत रोहिदास काटकर याच्यावर एकाच वेळी सर्व हल्लेखोरांनी लाथा बुक्क्यांनी जोरदार प्रहार केले. त्यावेळी एका हल्लेखोराने रस्त्यावर पडलेल्या मोठा दगडाने रोहिदास याच्या छातीवर जोरदार प्रहार केला, त्यात रोहिदास याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात विजय जाधव हा पण जखमी झाला.

वेल्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी मयत रोहिदास काटकर याचा भाऊ अविनाश काटकर याने वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगंळ यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख तपास करत आहेत. पानशेत पोलीस चौकीचे पोलिस अंमलदार आकाश पाटील, युवराज सोमवंशी, ज्ञानदीप धिवार आदी पोलिस जवानांसह वेल्हे व ग्रामीण पोलीस फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

पोलिसांपुढे मोठे आव्हान

रात्रीच्या सुमारास घटना घडल्याने तसेच खूनाचे कारण स्पष्ट झाले नसल्याने पोलीसांपुढे गुन्ह्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान उभे आहे. पानशेत बाजारपेठ, पानशेत वसाहत तसेच पुणे -पानशेत रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोर दुचाकी गाड्यावरुन आले होते तसेच ते त्याच गाड्यावरून फरार झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे, असे पानशेत पोलिस चौकीचे पोलिस अंमलदार आकाश पाटील यांनी सांगितले. ‌

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार