Children running away from home| मुंबईनंतर आता पुण्यात वाढतोय घरातून पळून येणाऱ्या मुलांचा ओढा ; पळून येण्याची धक्कादायक करणे आली समोर

| Updated on: Dec 21, 2021 | 9:56 AM

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक हिंसाचार , वादविवाद या सारख्या घटनामुळे अनेक मुलं घाटातून पळून येतात. काम- धंदा करून चांगलं आयुष्य जगाण्याचं उद्देशानेही पळून पुण्यात येणाऱ्या मुलांची संख्या अधिक आहे.यामध्ये बऱ्याचदा हरवलेल्या मुलांचा ही समावेश असतो.

Children running away from home|   मुंबईनंतर आता पुण्यात वाढतोय  घरातून पळून येणाऱ्या मुलांचा ओढा ; पळून येण्याची धक्कादायक करणे आली समोर
भारतीय रेल्वे
Follow us on

पुणे – ग्लॅमरस आयुष्य , बॉलीवूडच्या आकर्षणापोटी देशाच्या विविध भागातून पळून मुंबईत येणाऱ्या मुलांची संख्या अधिक आहे. दुसरीकडे घरातील कुटुंबियांच्या वादविवादाला कंटाळून , तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधता घरातून पळून पुण्यात येणाऱ्या मुलांची संख्याही वाढत आहे. यामध्ये पुणे शहर राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे. मागील काही वर्षांपूर्वी मुंबईत अश्या मुलांची संख्या अधिक होती मात्र आता पुणे शहरातही अश्या मुलांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. रेल्वे स्थानक परिसरात सापडणाऱ्या मुलांवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. रेल्वे प्रशासनानेदिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 2011  या वर्षात मुंबई विभागात 322 तर या पाठोपाठ पुणे विभागात 306 मुले- मुली सापडले आहेत.

अशी आढळतात मुलं
मध्य रेल्वेत मुंबई, नाशिक,पुणे, नागरपूर, सोलापूर, भुसावळ या विभागात देशाच्या अनेक भागातून गाड्या येत असतात. त्यावेळी तिकीट तपासणी करत असताना तसेच रेलेवं स्थानकावर संशयित रित्या फिरता ही मुलं आढळून येतात. चौकशी केल्यानंतर घरातून पळून आल्याचे समजते. रेल्वे कर्मचारी, रेलेवंस स्थानकावर काम करणारे स्थानिक विक्रेते यांच्या मदतीने या ,मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली जाते. त्यानंतर या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थाच्या मदतीने त्यांचे समुपदेशन करून पुन्हा कुटुंबीयांकडे पाठवले जाते.

चांगल्या आयुष्याच्या शोधात फिरतात मुलं

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक हिंसाचार , वादविवाद या सारख्या घटनामुळे अनेक मुलं घाटातून पळून येतात. काम- धंदा करून चांगलं आयुष्य जगाण्याचं उद्देशानेही पळून पुण्यात येणाऱ्या मुलांची संख्या अधिक आहे.यामध्ये बऱ्याचदा हरवलेल्या मुलांचा ही समावेश असतो. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार यंदा जानेवारीपासून नोव्हेंबर अखेरपर्यंत अशा 864 मुले आढळून आली आहेत. त्यात 535 मुले तर 329 मी मुलींचा समावेश आहे.

आई-वडील यांच्यातील वादामुळे पळून आलेली मुले-मुली चुकीच्या मार्गाला लागू नयेत. यासाठी रेल्वेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थाच्या मदतीने त्यांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा कुटुंबाकडे पाठवण्यात येते. रेल्वे कर्मचारी व रेल्वे दलाकडून या मुलांवर विशेषलक्ष ठेवले जात असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली आहे.

KDCC Bank Election | पाठीत खुपसलेला खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही, राजू शेट्टींचा सतेज पाटलांना इशारा

Nagpur | बालमित्र लग्नानंतर भेटला, नोकरीसाठी केली मदत, शारीरिक सुखाची मागणी आणि…

Rabi Season : गव्हावरील तांबेरा रोगाचे वेळीच कार व्यवस्थापन अन्यथा होईल उत्पादनात घट