बोगस मतदारांना चाप बसणार, आधार मतदान कार्डासोबत लिंक कसे करायचे?

अखेर लोकसभेने बोगस मतदारांना आणि त्यांच्या जीवावर उड्या मारणा-या नेत्यांना चाप लावलाच. बोगस मतदार हुडकून काढण्यासाठी आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र जोडण्यात येणार आहे. त्यामुळे गल्ली ते दिल्ली होणा-या निवडणुकींमधील बोगसगिरीला आळा बसेल. तर पाहूयात कसे लिंक करायचे आधारकार्ड तुमच्या मतदान कार्डसोबत

बोगस मतदारांना चाप बसणार, आधार मतदान कार्डासोबत लिंक कसे करायचे?
AAdhar-Card
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 9:24 AM

मुंबई : अखेर निवडणूक आयोगाच्या एका महत्वपूर्ण सूचनेला केंद्राने मुर्त रुप दिले आणि नवीन सुधारणा येऊ घातल्या आहेत. या नवीन सुधारणा आपल्या लोकशाहीसाठी मोठ्या पोषक आहेत. निवडणूक कायद्यात सुधारणा करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मतदान ओळखपत्र आणि आधारकार्ड यांच्या लिकिंगचा हा प्रस्ताव होता. केंद्राने हिरवी झेंडी दिल्याने या दोन कार्डच्या जोडणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ही प्रक्रिया पूर्णतः ऐच्छिक असली तरी बोगस मतदानाला चाप लावण्यासाठी आपण सर्वांनी मतदान ओळखपत्रासोबत आधार कार्डची नोंदणी करुन घ्यावी आणि बोगस मतदार हुडकून काढण्याच्या या मोहिमेत सहभागी व्हावे.  निवडणूक आयोगाने आधार कार्डसोबत मतदान ओळखपत्र जोडण्याची दुरूस्ती ही 2019 साली सुचवली होती. मतदानात होणारी गडबडी आणि बोगस मतदानाच्या प्रक्राराला आळा घालण्यासाठी ही दुरुस्ती सुचविण्यात आली होती. मात्र तीन वर्षात या प्रस्तावाला हात लावण्यात आला नाही. 2015 सालीच निवडणूक आयोगाने राष्ट्रीय निवडणूक कायद्यातंर्गत यासंबंधीची मोहीम राबविली. परंतु त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर हा कार्यक्रम थांबविण्यात आला होता. लोकसभेत या बिलाला मंजुरी मिळाली असली तरी आधारकार्डसोबत मतदान कार्डची ओळख संपूर्णतः ऐच्छिक ठेवली आहे. तर

ही प्रक्रिया कशी करायची ते पाहुयात

सर्वात अगोदर  https://voteportal.eci.gov.in आयोगाच्या या संकेतस्थळावर जा त्यानंतर Mobile no/ email / Voter ID No यामाध्यमातून पासवर्डसह लॉगइन करा सर्व माहिती भरल्यानंतर Search बटणावर क्लिक करा. सरकारकडे असलेला तुमचा डाटा जुळल्यास तो स्क्रीनवर दिसेल ‘Feed Aadhaar No’ या पर्यायावर क्लिक करा एक नवीन पेज तुमच्या समोर उघडेल. त्याठिकाणी आधारकार्डवरील तुमच्या नावाची अचूक या ठिकाणी नोंद करायची आहे. एकदा जमा केलेली माहिती अचूक आहे का याची खात्री करा आणि सबमिट बटण दाबा त्यानंतर स्क्रीनवर तुमचे रजिस्ट्रेशन झाल्याची माहिती दिसेल. संबंधीत बातम्या :

Lord Shiva Puja | आयुष्यात यश मिळवायचे असेल तर सोमवारी हे उपाय नक्की करुन पाहा

Astro Tips | “कुठं ठेवू अनं कुठं नको, अशी अवस्था होईल” एवढा पैसा येईल, त्यासाठी आठवड्याच्या सात दिवसात करायचे हे वेगवेगळे उपाय नक्की वाचा

Sankashti Chaturthi 2021 | कधी असणार वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी आणि पूजा मुहूर्त

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.