Nagpur | बालमित्र लग्नानंतर भेटला, नोकरीसाठी केली मदत, शारीरिक सुखाची मागणी आणि…

Nagpur | बालमित्र लग्नानंतर भेटला, नोकरीसाठी केली मदत, शारीरिक सुखाची मागणी आणि...
प्रातिनिधीक फोटो

नर्मदा कॉलनीतील रोशन अशोक खोडे ( वय ३८, रा. नर्मदा कॉलनी) असं आरोपीचं नाव आहे. या लैँगिक शोषणाच्या आरोपाखाली रोशनला गिट्टीखदान पोलिसांनी आता बेळ्या ठोकल्या.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 21, 2021 | 9:13 AM

नागपूर : एकाच वर्गात शिकणारे मित्र-मैत्रीण लग्नानंतर खूप दिवसांनी भेटले. तिला नोकरीची गरज होती. म्हणून त्यानं तिला खासगी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळवून देण्यास मदत केली. मदतीचा मोबदला म्हणून तो तिला शारीरिक सुखाची (physical pleasure) मागणी करू लागला. ती विवाहित असल्यानं बालमित्राला नकार देत होती. तरीही तो तिच्यावर हक्क दाखवू लागला. पण, नेहमीच्या या मागणीला ती कंटाळली आणि तीनं पोलिसांत लैंगिक शोषणाची (Physical Abuse) तक्रार केली.
नर्मदा कॉलनीतील रोशन अशोक खोडे ( वय ३८, रा. नर्मदा कॉलनी) असं आरोपीचं नाव आहे. या लैँगिक शोषणाच्या आरोपाखाली रोशनला गिट्टीखदान पोलिसांनी आता बेळ्या ठोकल्या.

लायसन्ससाठी केली मदत

३५ वर्षीय महिला आणि रोशन खोडे हे लहानपणीचे मित्र. एकाच शाळेत शिकले. तिचे लग्न झाले. तिला पती आणि दोन मुले आहेत. तर, रोशन हा आरटीओ दलाल आहे. दोन वर्षांपूर्वी वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी पीडित महिला आरटीओ कार्यालयात गेली. तेथे तिला रोशन भेटला. त्यानं तिला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी मदत केली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

नोकरीच्या मोबदल्यात केले खूश

पीडित महिलेची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळं तीनं त्याला नोकरीविषयी विचारले. त्यानं आपल्या ओळखीनं तिला एका शाळेत शिक्षिकेची नोकरी लावून दिली. तिचा संसार चांगला चालायला लागला. दरम्यान, रोशनचे तिच्या घरी जाणे-येणे वाढले. रोशन तिला शारीरिक सुखाची मागणी करू लागला. रोशननं तिला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. ती मजबूर होती. त्याचा फायदा त्यानं उचलला. शेवटी तीनंही त्याला खूश केले.

 

बायकोसारखे हक्क दाखवायला लागला

पण, रोशन आता तिच्यावर बायकोसारखे हक्क दाखवायला लागला. या संबंधास पीडितेनं विरोध केला. रोशन काही ऐकायला तयार नव्हता. तो तिला पतीला आणि तिच्या मुलांना मारण्याची धमकी पुन्हा देऊ लागला. दोन-तीन दिवसांपूर्वी तो तिच्या घरी आला. शारीरिक संबंधाची मागणी करू लागला. पीडितेनं नकार देताच त्यानं तिला मारहाण केली. म्हणून पीडित महिलेनं पोलिसांची मदत घेतली. बलात्कार केल्याची तक्रार गिट्टीखदान पोलिसांत केली. रोशनला पोलिसांनी अटक केली.

Feeling very cool | नागपूरकरांनाे काश्मीर, उटी, शिमल्याचा आनंद घ्या, पारा नीचांकी 7.8 डिग्रीवर

Nagpur Accident | दोन वर्षानंतर घराबाहेर पडला, शाळेत जाताना वाहनाने चिरडले; आठ वर्षीय बालकाचा घात झाला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें