Nagpur Accident | दोन वर्षानंतर घराबाहेर पडला, शाळेत जाताना वाहनाने चिरडले; आठ वर्षीय बालकाचा घात झाला

Nagpur Accident | दोन वर्षानंतर घराबाहेर पडला, शाळेत जाताना वाहनाने चिरडले; आठ वर्षीय बालकाचा घात झाला

थंडी असूनही अयान घराबाहेर पडला. शाळा कशाला बुडवायची असं त्याला वाटलं. पण, या थंडीच्या कडाक्यात त्याच्या कोवळ्या देहावरून टँकरची चाकं गेली. या चाकांखाली त्याच्या शरीराची वाताहत झाली.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 21, 2021 | 5:55 AM

नागपूर : आझाद कॉलनीतील (Azad Colony) अयान हा आठ वर्षांची चिमुकला. गेल्या दोन वर्षानंतर शाळेत गेला. शाळेतून परत येत असताना टँकर चालकानं त्याला धडक दिली. यात घटनास्थळीच अयानचा जीव गेल्याची घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.

अयान इरफान (वय आठ वर्षे) असं मृत बालकाचं नाव आहे. सक्करदऱ्यातील (Sakkaradara) आझाद कॉलनीत अयान झोपडपट्टीत राहतो. गेल्या दोन वर्षानंतर शाळा सुरू झाली. आता आपण चांगलं शिक्षण घेऊ असं अयानला वाटलं. रस्त्यात काही होईल, याची त्याला काही कल्पना नव्हती. तो शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला. तो घरी परतलाच नाही. त्याचा मृतदेह घरी आला.

टँकरच्या धडकेत चिमुकला ठार

सोमवारी सकाळी अकराची घटना. तो त्याच्या मित्रासोबत घराकडं परत येत होता. समोरून पाण्याचा भरधाव वेगात टँकर आला. चालक हमीद खान (वय २४) यानं निष्काळजीपणे वाहन चालवून अयानला जोरदार धडक दिली. टँकरच्या धडकेत छोटाचा जीव गंभीर जखमी झाला. रुग्णालयात डॉक्टरांनी अयानचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. अपघातामुळं परिसरात तणाव निर्माण झाला होता. सक्करदरा पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी हमीद खानविरोधात गुन्हा दाखल केला.

झोपडपट्टीत पोहचलेच नव्हते ऑनलाईन शिक्षण

अयान गेल्या दोन वर्षांपासून घरीच असल्यानं कंटाळला होता. मला शाळेत जायला आवडेल. खूप मज्जा करू, असं त्याला वाटत होतं. कारण लॉकडाऊनमध्ये त्याची सजा झाली होती. घराबाहेर पडता आलं नाही. झोपडपट्टीतपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचलेच नव्हते. घराबाहेर पडताना घरचे लोक अयानला भीती दाखवत होते.

 

कुडकुडत्या थंडीत गेल्या जीव

नागपुरात थंडी जोरात आहे. घराबाहेर पडणे तसे कठीण आहे. पण, अत्यावश्यक सेवेसाठी जावचं लागते. थंडी असूनही अयान घराबाहेर पडला. शाळा कशाला बुडवायची असं त्याला वाटलं. पण, या थंडीच्या कडाक्यात त्याच्या कोवळ्या देहावरून टँकरची चाकं गेली. या चाकांखाली त्याच्या शरीराची वाताहत झाली.

Video | Hair cutting | तुम्ही म्हणाल ही तर ‘गॉन केस’? पण तसं नाहीए, शिवा 20 कैच्या हातात घेऊन कापतो केस

Sant Gadge Baba | कीर्तनातून केले समाजप्रबोधन; कबीर-तुकाराम परंपरेतील संत गाडगेबाबा

Bhandara, Gondia ZP Election | प्रचार तोफा थंडावल्या, उद्या छुपा प्रचार, 21 ला होणार मतदान, प्रशासकीय यंत्रणा सज्ज

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें