आळंदीमध्ये वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; वेळेवर उपचार न मिळाल्याने तरुणीचा मृ्त्यू

तिला आळंदीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणले जात होते. मात्र प्रचंड वाहतूक कोंडीमुळे तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत.

आळंदीमध्ये वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; वेळेवर उपचार न मिळाल्याने तरुणीचा मृ्त्यू
| Edited By: | Updated on: Mar 07, 2023 | 9:17 AM

पुणे : वाहतूक कोंडी हा शहरात फार मोठा प्रश्न आहे. अशा वाहतूक कोंडीत सापडल्यानंतर पुढं निघणं कठीण होते. रुग्णावाहिकेसाठी विशेष सुविधा दिली गेली आहे. सायरन वाजवल्यानंतर रस्ता मोकळा करून दिला जातो. पण, कधी-कधी वाहतूक कोंडी येवढी मोठी असते की, त्यातून पुढं जाताचं येत नाही. अशीच एक दुर्घटना आळंदीमध्ये घडली. आळंदीमध्ये वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकल्याने 21 वर्षीय तरुणीला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. उज्वला नामदेव झाडे असं मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. उज्वला ही आंब्याच्या झाडावरून पडून जखमी झाली होती. तिला आळंदीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणले जात होते. मात्र प्रचंड वाहतूक कोंडीमुळे तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

उज्ज्वला नामदेव झाडे ही मुलगी आंब्याच्या झाडावर चढली होती. झाडावरून तोल गेल्याने ती खाली पडली. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. रुग्णवाहिका बोलावण्यात आली. रसत्याने जात असताना आळंदीत वाहतूक कोंडी होती. त्यामुळे तिची रुग्णावाहिका पुढं जाऊ शकत नव्हती. या वाहतूक कोंडीत ही रुग्णवाहिका सापडली. वेळेवर उपचार न मिळाल्याने उज्ज्वलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला.

तर तिचा जीव वाचला असता

उज्ज्वला झाडेला रुग्णालयात नेण्यात येत होते. आळंदीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जात होते. पण, रस्त्यात वाहतूक कोंडी खूप होती. ही वाहतूक कोंडी नसती तर तिचा जीव वाचला असता असं उज्ज्वलाचे नातेवाईक सांगत आहेत. उज्ज्वलाचे वय २१ वर्षे होते. ती तरुण असल्याने वेळेवर उपचार मिळाले असते, तर नक्कीच तिचा जीव वाचला असता. पण, उज्ज्वहा ही वाहतूक कोंडीचा बळी गेल्याची चर्चा आहे.