AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs USA : कॅप्टन सूर्या एकटाच भिडला, घरच्या मैदानात विक्रमी खेळी, यूएसएसमोर 162 धावांचं आव्हान, जिंकणार?

India vs United States Of America 1st Innings Highlights : यूएसए विरुद्धचा सामना असल्याने भारतीय फलंदाज वानखेडे स्टेडियममध्ये 300 धावांचा आकडा गाठतील, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळत होती. मात्र भारतीय फलंदाजांनी यूएसएसमोर गुडघे टेकले.

IND vs USA : कॅप्टन सूर्या एकटाच भिडला, घरच्या मैदानात विक्रमी खेळी, यूएसएसमोर 162 धावांचं आव्हान, जिंकणार?
Suryakumar Yadav Fifty Against USAImage Credit source: Bcci x Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 07, 2026 | 10:31 PM
Share

गतविजेत्या टीम इंडियाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात घोर निराशा केली. भारताचे प्रमुख फलंदाज तुलनेत नवख्या यूएसए टीम विरुद्ध अपयशी ठरले. मात्र कॅप्टन सू्र्यकुमार यादव याने एकट्याने किल्ला लढवला. सूर्याने केलेल्या चिवट आणि झुंजार नाबाद खेळीच्या जोरावर भारताला 150 पार मजल मारता आली. सूर्याने वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याची सर्वात मोठी खेळी केली. सूर्याने केलेल्या खेळीमुळे भारताला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 161 धावा करता आल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे वानखेडे स्टेडियमध्ये यूएसएसमोर 20 ओव्हरमध्ये 162 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता भारतीय गोलंदाज यूएसएला हे आव्हान गाठण्यापासून रोखणार का? हे काही तासांतच स्पष्ट होईल.

टीम इंडियाचे फलंदाज ढेर

यूएसएने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. बॅटिंगची संधी मिळाल्याने भारतीय फलंदाजांची फटकेबाजी पाहायला मिळेल, या विचाराने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र हा आनंद पुढील काही मिनिटांत हवेत विरला. यूएसएने दुसऱ्याच ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा याला आऊट केलं. अभिषेक शर्मा याला भोपळाही फोडता आला नाही. अली खान याने अभिषेकला संजय कृष्णमुर्ती याच्या हाती कॅच आऊट केलं.

शॅडली व्हॅन शाल्कविकचा भारताला झटका

इशान किशन आणि तिलक वर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी आश्वासक भागीदारी केली. मात्र सहाव्या ओव्हरमध्ये यूएसएच्या शॅडली व्हॅन शाल्कविक याने कहर केला. शॅडली व्हॅन शाल्कविक याने एकाच ओव्हरमध्ये भारताला 3 झटके दिले. शॅडली व्हॅन शाल्कविक याने इशान किशन, तिलक वर्मा आणि शिवम दुबे या तिघांना आऊट केलं. इशानने 20 आणि तिलकने 25 रन्स केल्या. तर शिवमला अभिषेकप्रमाणे भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाची 6 ओव्हरमध्ये 4 आऊट 46 अशी नाजूक स्थिती झाली.

त्यानंतर सूर्या आणि रिंकु या जोडीने पाचव्या विकेटसाठी 26 धावा जोडल्या. मात्र त्यानंतर रिंकु आऊट झाला आणि जोडी फुटली. रिंकूने 6 धावा केल्या. रिंकूनंतर हार्दिक पंड्याही झटपट आऊट झाला. हार्दिकने 5 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. एका बाजूला विकेट जात होते. तर दुसऱ्या बाजूला सूर्या किल्ला लढवत होता.

अक्षरकडून सूर्याला चांगली साथ

हार्दिकनंतर मैदानात आलेल्या उपकर्णधार अक्षर पटेल याने सूर्याला चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 24 बॉलमध्ये 41 रन्सची पार्टनरशीप केली. अक्षर 14 धावा करुन मैदानाबाहेर गेला.

सूर्याने त्यानंतर अर्शदीप सिंह याच्यासोबत 14 बॉलमध्ये 22 रन्सची पार्टनरशीप केली. अर्शदीप 4 रन्स करुन आऊट झाला. तर सूर्याने वरुण चक्रवर्ती याच्यासह 20 रन्स जोडल्या. वरुण शेवटच्या बॉलवर चोरटी धाव घेताना रन आऊट झाला. वरुन झिरोवर आऊट झाला. तर सूर्याने भारतासाठी 49 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 10 फोरसह नॉट आऊट 84 रन्स केल्या. यूएसएसाठी शॅडली व्हॅन शाल्कविक याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. हरमीत सिंह याने दोघांना बाद केलं. तर मोहम्मद मोहसिन आणि अली खान या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना