AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅरिफबद्दल संघाची भूमिका काय? मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

RSS : मुंबईतील विविध क्षेत्रातील निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना आरएसएसचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नवे क्षितिज या व्याख्यानमालेतून संबोधित केले. यावेळी त्यांनी टॅरिफवर आरएसएसची भूमिकाही स्पष्ट केली.

टॅरिफबद्दल संघाची भूमिका काय? मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
Mohan Bhagwat RSS
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 07, 2026 | 9:16 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत संवाद कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील विविध क्षेत्रातील निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना आरएसएसचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नवे क्षितिज या व्याख्यानमालेतून संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच अमेरिकन टॅरिफबद्दलही संघाची भूमिका स्पष्ट केली. टॅरिफबद्दल मोहन भागवत नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

आपण स्वदेशी स्वीकारले पाहिजे – भागवत

टॅरिफच्या मुद्द्यावर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, आपण जगापासून अलिप्त राहू शकत नाही, परंतु जर आपण व्यवहार केले तर आपण ते स्वेच्छेने करू. आपण कोणाच्याही दबावाखाली असे करणार नाही किंवा टॅरिफवर आधारित निर्णय घेणार नाही. आपण जे काही खरेदी करतो ते आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करेल. आपण स्वदेशी स्वीकारले पाहिजे. जिथे परदेशात जाण्याशिवाय पर्याय नाही आणि दुसरा पर्याय नाही तिथे परदेशी वस्तू वापरता येतात. धोरण पातळीवर, आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यवहार करावे लागतात. धोरण हळूहळू पुढे जात आहे. धोरण बदलते आणि स्वतःच्या गतीने प्रगती करेल, परंतु देशांतर्गत पातळीवर, आपण स्वदेशी लागू करू.

संघाचं काम कसं आहे?

संघाच्या कामावर बोलताना भागवत म्हणाले की, संघाच काम हे वेगळं काम आहे. पूर्ण जगात असं काम नाही असं आधी आम्ही म्हणायचो, आता आम्ही काम करत असताना देखील अनुभवत आहोत. जगातील लोकं संघाचं काम पहायला येत आहेत. आफ्रिका, अमेरिका, कोरिया या देशातील लोकं म्हणतात तुमच्या कामा प्रमाणे आम्हाला आमच्या देशात युवकांसाठी काम करायचं आहे, आपण आम्हाला ते शिकवाल का? तथागत बुद्धांनंतर असं काम कुणी केलेलं नाही. असं काम करणारा दुसरा कोणी उपलब्धच नाही. आकाश कसं आहे तर आकाशा सारखा आहे दुसर उदाहरण नाही. समुद्र कसा आहे समुद्रा सारखा आहे दुसरं उदाहरण नाही. अगदी असंच संघाचं काम आहे.

संघाचं काम संघासाठी नसून संपूर्ण देशासाठी आहे

मोहन भागवत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, ‘संघाला इतर पक्ष आहे, विचारधारा यासोबतच जोडू पाहत आहेत ते चुकीच आहे. संघाला वरून आणि लांबून पाहाल तरी सुद्धा गैरसमज निर्माण होतात. संघ कवायती करतो परंतु संघ पॅरामिलिट्री ऑर्गनायझेंशन नाही. संघाचे स्वयंसेवक लाठी काठी शिकतात परंतु ते कोणताही आखाडा नाही. संघ अखिल भारतीय संगीत शाळा नाही संघाचे स्वयंसेवक राजकारणात आहेत मात्र संघ राजकीय पक्ष नाही. काही गोष्टी वरून पाहिल्या की गैरसमज निर्माण होतो त्यामुळे संघाला आतून जाणून घेणे गरजेचे आहे. साखर कशी आहे हे अनुभवायला केवळ एक चमचा साखर खाल्ली तरी कळत साखर कशी आहे. परंतु असं काही खायचं असेल तर त्याची परीक्षा घेणे गरजेचे नाही एवढ तरी कळायला हवं. यामुळे 100 वर्षानंतर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की संघ काय आहे? संघाच काम हे संघासाठी नाही ते संपूर्ण देशासाठी आहे.’

संघाला प्रसिद्धी नको आहे

पुढे बोलताना भागवत म्हणाले की,’संघ काय आहे हे जाणून घेण्यासाठी संघ काय नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. संघ दुसऱ्या कोणत्याही संघटनेसोबत स्पर्धा करण्यासाठी निघाला नाही आणि जाणार ही नाही. संघ कोणत्या विशिष्ट परिस्थितीत प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेला नाही. संघ कोणाच्या विरोधात चाललेला नाही. संघच काम कोणाचा ही विरोध न करता काम करत चालत राहणारा आहे. संघाला प्रसिद्धी नको आहे. संघाला ताकद नको आहे. संघ जी देशात चांगली कामे सुरू आहेत ती पूर्ण करण्यासाठी काम करत आहे.’

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?