बारावी गणित पेपरफूट प्रकरण, तपास आता एसआयटीकडे; आरोपींची संख्या सातवर

गणिताचा पेपर फोडण्यात आला. या प्रकरणी काही आरोपींना अटकही झाली. हे प्रकरण उघडकीस आले म्हणून माहीत झाले. आता एसआयटी तपास करणार असल्यानं दोषींवर कारवाई निश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बारावी गणित पेपरफूट प्रकरण, तपास आता एसआयटीकडे; आरोपींची संख्या सातवर
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 8:39 AM

बुलढाणा : जिल्ह्यात बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने शिक्षण यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेलीय. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. बारावी गणित पेपरफुटीच्या प्रकरणात आता विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. रविवारी पकडलेल्या दोन्ही आरोपी शिक्षकांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या आरोपींना देऊळगावराजा न्यायालयात हजर करण्यात आले होते. आतापर्यंत या प्रकरणात आरोपींची संख्या सातवर गेली आहे. एसआयटीचे हे पथक मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणार आहे.

पेपर सोशल मीडियावर व्हायरल

राज्यभरात गाजलेल्या इयत्ता बारावीचा गणित पेपर सोशल मीडियाद्वारे फुटल्याची घटना तीन मार्च रोजी सिंदखेड राजा तालुक्यात घडली. तो पेपर ही सोशल मीडियावर व्हायरल झाला. पेपर फुटल्याचे प्रकरणं विधिमंडळांत सुद्धा चर्चिल्या गेले. यातून हा प्रकार संपूर्ण राज्यभरात चर्चेत आला होता. शिक्षण विभागाने पोलिसांत तक्रार दिल्यावर चौकशी करण्यात आली. गणिताचा पेपर फोडण्यात आला. या प्रकरणी काही आरोपींना अटकही झाली. हे प्रकरण उघडकीस आले म्हणून माहीत झाले. आता एसआयटी तपास करणार असल्यानं दोषींवर कारवाई निश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आरोपींची संख्या सातवर

खाजगी संस्थाचालक असलेले शिक्षक गजानन आडे, गोपाल शिंगणे यांच्यासह गणेश पालवे, पवन नागरे आणि गणेश नागरे या पाच जणांना आरोपी ठरवत अटक करण्यात आली. या पाचही आरोपींना देऊळगावराजा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व होत असतानाच उशिरा लोणार येथील शाळेवर कार्यरत असलेल्या शेख अकील शेख मुनाफ आणि अंकुश पवार या दोघांना रात्री अटक करण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणात आरोपींची संख्या सात झालीय. त्यानंतर आता तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.