Dehu Crime : धक्कादायक ! देहू संस्थानचे आजी-माजी विश्वस्त आणि नगरसेवकांमध्ये रंगला तीन पत्ती जुगाराचा खेळ, एकूण 26 जणांना अटक

| Updated on: Aug 04, 2022 | 12:50 AM

या कारवाईमध्ये पोलिसांनी 5 लाख 36 हजार 610 रुपयांची रोख रक्कम, दोन कार, 18 मोटारसायकली, 27 मोबाईल असा एकूण 35 लाख 10 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Dehu Crime : धक्कादायक ! देहू संस्थानचे आजी-माजी विश्वस्त आणि नगरसेवकांमध्ये रंगला तीन पत्ती जुगाराचा खेळ, एकूण 26 जणांना अटक
अमृतसरमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीत बॉम्ब
Follow us on

देहू : पवित्र आणि संतांची भूमी असलेल्या देहू संस्थानमधील काही आजी-माजी विश्वस्तांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. संत तुकाराम महाराज संस्थाचे विश्वस्त (Trustee), देहू नगरपंचायतीचे नगरसेवक (Corporator) आणि एका नगरसेविकेच्या पतीसह 26 जणांना तीन पत्ती जुगार (Gambling) खेळताना पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी शाखेकडून अटक करण्यात आली आहे. चाकण एमआयडीसी जवळील येलवाडी गावातील एका बंद कंपनीमध्ये दुसऱ्या मजल्यावर हा जुगार अड्डा सुरू होता. या अड्ड्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार कारवाई केली असता तब्बल 26 व्यक्ती त्या ठिकाणी जुगार खेळत होते.

संत तुकाराम महाराज संस्थानच्या आजी-माजी विश्वस्तांचा समावेश

या कारवाईमधील धक्कादायक बाब म्हणजे देहूमधील संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विशाल केशव मोरे आणि माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे यांच्यासह देहू नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक मयूर टिळेकर आणि एका नगरसेविकेचे पती विशाल परदेशी यांचा अटक आरोपींमध्ये समावेश आहे. देहूमधील संत तुकाराम महाराज संस्थांमधील आजी-माजी विश्वस्त या कारवाईत सापडल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

एकूण 35 लाख 10 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईमध्ये पोलिसांनी 5 लाख 36 हजार 610 रुपयांची रोख रक्कम, दोन कार, 18 मोटारसायकली, 27 मोबाईल असा एकूण 35 लाख 10 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सर्व आरोपींविरोधात महाळुंगे पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंच्या आदेशानुसार दरोडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट 5 ने अवैध धंद्याविरोधात कारवाई केली. (Dehu Sansthan trustees and corporators of Dehu arrested for gambling)

हे सुद्धा वाचा