पिंपरीत लॉजवर देह व्यापार, दोन महिलांची सुटका, छाप्यात सापडली कंडोमची पाकिटं

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकाद्वारे महाळुंगे पोलीस चौकी हद्दीत निघोजे भागात हॉटेल आर्यन लाँजिंग बोर्डिंगवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दोघी पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

पिंपरीत लॉजवर देह व्यापार, दोन महिलांची सुटका, छाप्यात सापडली कंडोमची पाकिटं
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 2:45 PM

पुणे : महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यात तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी लॉजवर छापा टाकत ही कारवाई केली. यावेळी रोख रक्कम, मोबाईल आणि निरोधाचं पाकीट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकाद्वारे महाळुंगे पोलीस चौकी हद्दीत निघोजे भागात हॉटेल आर्यन लाँजिंग बोर्डिंगवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दोघी पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

तिघा आरोपींना अटक

हॉटेल चालक मालक महिला नवशाद शेख, विष्णू झांजे आणि मॅनेजर योगेश वारे यांना अटक करण्यात आली आहे. तीनही आरोपी दोन पीडित महिलांना देह व्यापार करण्यासाठी प्रवृत्त करुन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचा आरोप आहे.

आरोपींवर गुन्हा, दोघींची सुटका

महिलांकडून वेश्या करवून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून आरोपी स्वतःची उपजीविका भागवत असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या ताब्यातून 3 हजार रुपयांची रोख रक्कम, 30 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन आणि 85 रुपये किमतीचे कंडोम पाकीट असा एकूण 33,085 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघा आरोपींच्या विरुद्ध PITA कलम 3,4,5 सह भादंवि कलम 370 (3) ,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

खुर्चीला हात-पाय बांधून नातवानेच गळा चिरला, नागपुरातील महिला डॉक्टरच्या हत्येचं गूढ उकललं

19 वर्षीय तरुणी रस्त्यात मृतावस्थेत, शेजारी रक्तरंजित चाकू आणि विषाची बाटली, प्रियकर ताब्यात

गरोदर असल्याचं सांगून लग्नाचा तगादा, पण प्रेयसीला गर्भाशयच नव्हतं, प्रियकराने काटा काढला