पुण्यात सराईत वाहनचोर अटकेत, 51 दुचाकींसह 36 लाखांचा मुद्देमाल जप्त

| Updated on: Nov 04, 2021 | 9:04 AM

20 वर्षीय शंकर जगले आणि 35 वर्षीय संतोष घारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तळेगाव दाभाडे इथं मोठ्या प्रमाणात वाहन चोरी होत असल्याचे समोर आल्याने तपास केला असता पोलिसांनी त्यांना अटक केली.

पुण्यात सराईत वाहनचोर अटकेत, 51 दुचाकींसह 36 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुण्यात 51 दुचाकी चोरणारे दोघे गजाआड
Follow us on

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

20 वर्षीय शंकर जगले आणि 35 वर्षीय संतोष घारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तळेगाव दाभाडे इथं मोठ्या प्रमाणात कार चोरी होत असल्याचे समोर आल्याने तपास केला असता पोलिसांनी त्यांना अटक केली.

36 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

त्यांच्याकडून 51 दुचाकी-रिक्षा आणि मोबाईल असा एकूण तब्बल 36 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी संतोष घारे याच्यावर वाहन चोरीचे 200 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

पाच सराईत गुन्हेगारांना अटक

दुसरीकडे, पिंपरी चिंचवडमध्ये पाच सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून आठ पिस्तुल, एक रिव्हॉलर आणि 11 जिवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केली आहे

प्रताप ऊर्फ बाळ्या पवार, पंकज ऊर्फ बंडा पारीख, गौरव डोंगरे, शंकर वाडेकर आणि अजय सातपुते अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे पाचही आरोपी सराईत असून त्यांच्याकडून हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

धक्कादायक! सहकाऱ्याने लग्न मोडलं, छळवणुकीला कंटाळून पुण्यात महिला पोलिसाची आत्महत्या

सीआयडी मालिका पाहून पुण्यात भलतंच कृत्य; अल्पवयीन मुलांकडून वृद्ध महिलेची हत्या

कळव्यात करवा चौथला दुसरी थेट घरी आली, नवऱ्यानं पहिलीला जीवंत जाळलं, गर्भवतीचं काय चुकलं?