पुणे शहरातील उच्चभ्रू सोसायटीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन एजंट अटकेत

खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना पुणे तसेच पिंपरी चिंचवड या भागात घडल्या आहेत. पुणे शहरातील काही भागात वेश्याव्यवसाय सुरु आहे. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हे व्यवसाय सुरु आहे.

पुणे शहरातील उच्चभ्रू सोसायटीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन एजंट अटकेत
| Updated on: Feb 15, 2023 | 3:10 PM

पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात (Pune Crime) गुन्हेगारी वाढली आहे.  पुणे शहरात कोयता गँग व गुन्हेगारीमुळे नागरीक घाबरलेले आहेत. खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना पुणे तसेच पिंपरी चिंचवड या भागात घडल्या आहेत.  पुणे शहरातील काही भागात वेश्याव्यवसाय सुरु आहे. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हे व्यवसाय सुरु आहे. पुणे शहरातील कोरेगाव पार्कसारख्या भागात सुरु असणाऱ्या वेश्याव्यवसायाचा (Prostitution) भांडाफोड पोलिसांनी केला आहे. या ठिकाणांवरुन पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली आहे. तसेच या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.

कुठे सुरु होता व्यवसाय

पुणे शहरातील कोरेगाव पार्क हा उच्चभ्रू परिसर आहे. या भागात आशियाना पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. या सोसायटीतील फेमिना स्पा मध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी छापा टाकला. त्यांना तीन महिला वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या.

पोलिसांनी त्या तिघं महिलांची सुटका केली. 24, 28 आणि 43 वर्षीय त्या महिला होत्या. या ठिकाणावरुन दोघांना अटक करण्यात आली आहे. नजमूल सुतवली हुसेन (वय 19) आणि रिपुल आलम (वय 19) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

जागामालकचा शोध सुरु


पोलिसांनी फेमिना स्पामध्ये छापा टाकला असताना जागा मालक आढळला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. तसेच जागा मालक आणि स्पाचालक एकच आहे का? याचीही शोध घेतला जात आहे.

काय असतो स्पा सेंटर


पाश्चात्य देशांमधील स्पा सेंटरचा फंडा गेल्या काही वर्षांपासून भारतात आला आहे. भारतातील अनेक लहान, मोठ्या शहरांमध्ये स्पा सेंटरचे बोर्ड लावलेले दिसतात. या ठिकाणी मसाज केली जाते. स्वीडिश, डिप टिश्यू व ट्रिगर प्वाइंट असे वेगवेगळे अनेक पर्याय देऊन मसाज केली जाते. यामाध्यमातून काही ठिकाणी वेश्याव्यवसाय केला जातो.

शहरात अनेक ठिकाणी सेंटर

शहरात अनेक ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली सर्रास अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांनी अशा सेंटर्सवर छापा टाकून कारवाई करण्याची मागणी होत आहे. काही स्पा तर निवासी संकुलातही थाटण्यात आल्याचे प्रकार याआधी समोर आले होते. त्यामुळे अशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.