Pune Crime : पुणे, पेढे आणि उंदराचं औषध! आत्महत्या वाटणारी घटना हत्या असल्याचं कसं कळलं?

लग्नाचं वचन देऊन संबंध ठेवले, तिने लग्नाचा तगादा लावताच उचचलं टोकाचं पाऊल

Pune Crime : पुणे, पेढे आणि उंदराचं औषध! आत्महत्या वाटणारी घटना हत्या असल्याचं कसं कळलं?
पुण्याच्या आंबेगाव येथील धक्कादायक घटना
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Nov 25, 2022 | 9:58 AM

पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. पण नंतर मुलीने लग्नासाठी तगादा लावताच तिची थेट हत्या करण्यात आली. पण ही हत्या नसून आत्महत्या आहे, असा बनाव आरोपीकडून रचण्यात आला होता. अखेर हे सगळं प्रकरण पोलिसांच्या तपासातून उघड झालंय. ही घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात घडलीय. गेल्या 2 वर्षापासून आरोपीचे पीडितेसोबत प्रेमसंबंध होते, अशीही माहिती समोर आलीय.

अल्पवयीन मुलीला जबरदस्ती आरोपीनं पेढे खायला दिला होता. या पेढ्यात उंदराचं विष कालवण्यात आलं होतं, असं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. दरम्यान, प्रथमदर्शनी आत्महत्या वाटणारी ही घटना हत्याकांडाचा प्रकार होता, हे आता उघड झालंय.

धक्कादायक पाऊल

रोहिदास करोटे नावाच्या आरोपीचे एका अल्पवयीन मुलासोबत संबंध होते. रोहिदास याने अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला होता. पण जेव्हा मुलगी लग्नासाठी आरोपी रोहिदास याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपीने अल्पवयीन मुलीला संपवण्यासाठी धक्कादायक पाऊल उचललं होतं.

रोहिदास याने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने उंदराचं औषध देऊन तिचा खून केला होता. त्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी आत्महत्येचा बनाव केला होता. पण अखेर पोलिसांच्या तपासात हे सगळं प्रकरण उघडकीस आलं होतं.

आरोपी रोहिदास याने पीडितेला पेढ्यातून उंदराचं औषध दिलं होतं. त्यात पीडितेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी घोडेगाव पोलीस तपास करत होते. तपासाअंती रोहिदास याने रचलेलं संपूर्ण कट उघडकीस आला असून आता त्याला पोलिसांनी अटकही केली आहे. घोडेगाव पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.