पुणे शहरात धक्कादायक घटना, पतीने पत्नीला विवस्त्र करुन नाचवले

Pune Crime News : पुणे शहरातील एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पती अन् पत्नी या पवित्र नात्याला काळीमा फसणारे हे कृत्य पतीने केले आहे. शेवटी पत्नीने पोलिसांत धाव घेत पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे शहरात धक्कादायक घटना, पतीने पत्नीला विवस्त्र करुन नाचवले
ताडदेव परिसरात चोरीदरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू
| Updated on: Aug 11, 2023 | 2:08 PM

पुणे | 11 ऑगस्ट 2023 : भारतीय संस्कृतीत पती, अन् पत्नीचे नाते हे सात जन्माचे म्हटले जाते. लग्न १६ संस्कारपैकी हा एक संस्कार असतो. त्यात सात फेरे घेत एकमेकांना वचन दिले जाते. परंतु पुणे शहरात पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पुणे शहरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे समाजातील सर्वांना धक्का बसला आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. शेवटी पत्नीला हे सर्व असहाय्य झाल्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडला प्रकार

पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडला आहे. या भागातील नाना पेठेत २०१५ पासून पती, पत्नी राहत होते. परंतु त्या व्यक्तीने पती आणि पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. पतीने पत्नीला मोबाईलवरती अश्लील फिल्म दाखवली. त्यानंतर पत्नीला विवस्त्र करून नाचायला लावले. तो येथेच थांबला नाही. त्यानंतर त्याने पत्नीचा व्हिडिओ देखील बनवला.

अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत

गेल्या अनेक वर्षांपासून नराधम पती पत्नीसोबत हा सगळा प्रकार करत होता. पत्नी त्याला वारंवार असे काही करु नका, अशी विनंती करत होता. परंतु तो ऐकण्याचा मनस्थिती नव्हता. त्याचा हा प्रकार वाढत चालला होता. नेहमी तो असे व्हिडिओ शूटिंग करत होता. जर कुणाला सांगितले तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. यामुळे या जाचाला त्रासलेल्या पत्नीने पोलिसांत धाव घेतली. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन या प्रकरणी पुणे पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.