Pune Fire: सिनेमाच्या शूटिंगचं सामान गोडाऊनच्या आगीत जळून खाक! भोरच्या रामबागेत भीषण अग्नितांडव

| Updated on: Jun 02, 2022 | 9:32 AM

Pune Bhor Fire : संध्याकाळच्या सुमारास अचानक गोडाऊनमधून धूर यायला सुरवात झाली आणि थोडयाच वेळात लागलेल्या आगीने नंतर भीषण रुप धारणं केलं.

Pune Fire: सिनेमाच्या शूटिंगचं सामान गोडाऊनच्या आगीत जळून खाक! भोरच्या रामबागेत भीषण अग्नितांडव
आगीत मोठं आर्थिक नुकसान
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे : पुण्यातल्या (Pune News) भोरमधील रामबाग येथे फिल्म शूटिंगच (Pune Fire News) सामान असलेल्या गोडाऊनला आग लागली. या आगीत संपूर्ण गोडावून (Bhor godown Fire) जळून खाक झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत सुमारे 11 लाखांचं नुकसान झालंय.आगीचं कारणं अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आल भडकली असणयाची शक्यताय. अग्निशामक दलाचे जवान आणि सह्याद्री रेस्क्यू टीम यांच्या 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणली. गोडाऊन मध्ये शूटिंगसाठी वापरले जाणारे कपडे, दागिने, टेबल, खुर्चीसह शूटिंगच्या सेटसाठी वापरल जाणारं साहित्य ठेवण्यात आलं होतं. आगीत हे संपूर्ण साहित्य जळून खाक झालाय. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान या आगीत झालं आहे.

आधी धूर आला आणि मग….

संध्याकाळच्या सुमारास अचानक गोडाऊनमधून धूर यायला सुरवात झाली आणि थोडयाच वेळात लागलेल्या आगीने नंतर भीषण रुप धारणं केलं. काही वेळातचं अग्निशामक दलाचे जवान आणि सह्याद्री रेस्क्यू टीमचे कर्मचारी घटनास्थळी दाखलं झाले. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आलं. मात्र आगीत गोडाऊनमध्ये ठेवलेलं संपूर्ण सामान जळून खाक झालंय.

11 लाख रुपयांचं नुकसान

पुण्यातल्या भोरमधील रामबाग इथं गोडाऊनमध्ये फिल्म शूटिंगच सामान ठेवण्यात आलं होतं. या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमध्ये सुमारे 11 लाखांचं साहित्य जळून मोठं आर्थिक नुकसान झालंय.

हे सुद्धा वाचा

भोर तालुक्याला निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलाय. त्यामुळे अनेक हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या निर्मात्यांची, चित्रीकरणासाठी भोरला पसंती असते. त्यामुळं भोर तालुक्यात हिंदी मराठी चित्रपट, जाहिराती, गाणी यांचं चित्रीकरण मोठ्या प्रमाणात होतं असतं. या शूटिंगसाठी लागणारं मटेरियल ठेवलेल्या भोर मधील रामबाग परिसरात असणाऱ्या गोडाऊनमध्ये, कपडे, दागिने, खुर्ची, टेबल यांच्यासह शूटिंगच्या सेटसाठी लागणाऱ्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. या सर्व वस्तूंचा आगीत जळून कोळसा झालाय. गोडाऊन मालकांचं या आगीत मोठं नुकसान झालंय.