महाविद्यालयीन तरुणाचे नग्न व्हिडिओ अन् फोटो काढले…मग त्याने मेट्रो स्टेशनवर धक्कादायक केला प्रकार

आरोपींनी सुजल याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यातील ३५ हजार ५०० रुपये सुजल याने संशयिताना दिले. मात्र आणखी पैशांची मागणी करत संशयितांनी सुजल याला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून सुजल याने संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी घेतली.

महाविद्यालयीन तरुणाचे नग्न व्हिडिओ अन् फोटो काढले...मग त्याने मेट्रो स्टेशनवर धक्कादायक केला प्रकार
Pune Metro Sation
| Updated on: Mar 19, 2025 | 11:39 AM

Pune Crime: पुणे शहरातील पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम मेट्रो स्टेशनवर धक्कादायक प्रकार घडला आहे. मेट्रोच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत एका 21 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. त्याने स्वत:चे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या सहा जणांनी त्या तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देवून त्याच्याकडून पैसे उकळले.

तरुणास असे फसवले

पिंपरीतील एका नामांकित महाविद्यालयात बीसीएच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या सुजल सुनील मानकर या तरुणाने मेट्रो स्टेशनवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची एक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सहा तरुणांसोबत ओळख झाली होती. या सहा तरुणांनी त्याला 25 फेब्रुवारीला पिंपरी येथे भेटण्यासाठी बोलावले. तिथे त्याचे नग्न व्हिडिओ, फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याच्याकडून पैसे उकळले. एकवेळा पैसे दिल्यानंतर ही ब्लॅकमेलिंग थांबली नाही.

पैसे दिल्यानंतर आणखी पैशांची मागणी

आरोपींनी सुजल याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यातील ३५ हजार ५०० रुपये सुजल याने संशयिताना दिले. मात्र आणखी पैशांची मागणी करत संशयितांनी सुजल याला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून सुजल याने संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी घेतली. आता याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सुजल सुनील मनकर (वय २१) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुजल याचे वडील सुनील बाजीराव मनकर (४७, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव किशोर शिंदे (वय २१), नितीन पाटील (२२), संदीप रोकडे (२०), आकाश चौरे (२०, चौघे रा. महेशनगर पिंपरी. मूळ रा. धुळे), लोपेश राजू पाटील (२०, महेशनगर, पिंपरी. मूळ रा. पातोंडा, जळगाव), प्रथमेश परशुराम जाधव (१९, महेशनगर, पिंपरी. मूळ रा. सातारा) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला