Pune Crime : जर्मनीत नोकरीचे आमिष, पुणे शहरातील अभियंत्याला फसवले, पुढे काय घडले…

Pune Crime News : पुणे शिक्षणाचे आणि रोजगाराचे हब झाले आहे. देशभरातून विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात. तसेच पुणे शहरात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. यामुळे पुण्यात रोजगार मिळवण्यासाठी तरुणांचा कल आहे. पण एका इंजिनिअरने...

Pune Crime : जर्मनीत नोकरीचे आमिष, पुणे शहरातील अभियंत्याला फसवले, पुढे काय घडले...
| Updated on: Aug 31, 2023 | 11:30 AM

पुणे | 31 ऑगस्ट 2023 : पुणे शहर औद्योगिक नगरी आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी आहे. इतर विविध प्रकल्पही पुण्यात आहेत. यामुळे पुणे शहरात रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. पुणे शहरातील एका युवक विदेशात नोकरीची संधी शोधत होता. त्यासाठी त्याने काही जणांशी ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्कही केला होता. एका व्यक्तीने त्याला जर्मनीतील चांगल्या कंपनीत अभियंता म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन दिले. मग त्या अभियंत्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला.

नोकरीचे आश्वासन अन्…

पुणे शहरातील अभियंता असलेल्या एका तरुणास विदेशात नोकरी करायची होती. त्यासाठी तो काही जणांचा संपर्कात होता. दिल्ली येथील जयंतकुमार मलिक यांचा संपर्कात तो युवक आला. त्याने आपली विदेशात अनेक ठिकाणी ओळखी आहेत. जर्मनीत मी अनेकांना नोकऱ्या दिल्या आहेत. तुम्हालाही चांगल्या पॅकेजची नोकरी लावून देईल, असे आश्वासन दिले. विदेशातील नोकरीसाठी 11.90 लाख रुपये लागतील, असे सांगितले. मग त्यासाठी तो युवक तयार झाला. त्याने पैसे दिले. जर्मनीतील ऑटोमोबाईल कंपनीत ही नोकरी असणार असल्याचे जयंतकुमार मलिक याने सांगितले.

पुढे जावे लागले पोलीस ठाण्यात

पैसे दिल्यानंतर अनेक महिने झाले. परंतु विदेशातून नोकरीची ऑफर काही आली नाही. यामुळे त्या युवकाने पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादीचे नाव जाहीर केलेले नाही. परंतु फसवणुकीची तक्रार येताच पोलिसांनी तपास सुरु केला. जयंतकुमार मलिक यांच्याशी झालेले मोबाईल संभाषण तपासले. त्यानंतर तो दिल्लीतील गुरुग्राममध्ये असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दिल्लाला जाऊन त्या व्यक्तीला अटक केली.

ऑनलाईन सर्चमधून झाला होता संपर्क

फसवणूक झालेला व्यक्तीचा जयंतकुमार मलिक यांच्याशी ऑनलाईन जॉब सर्चच्या माध्यमातून संपर्क झाला होता. तो विदेशात नोकऱ्या देण्यासाठी प्लेसमेंट एजन्सीचे काम करत असल्याचे सांगत होतो. परंतु फिर्यादीने कोणतीही खातरजमा न करता त्याला पैसे दिले. यामुळे त्याची फसवणूक झाली. पोलिसांनी कोणत्या आमिषाला बळू पडू नका, प्रत्येक गोष्टीची खातरजमा करा, असे आवाहन केले आहे.