शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांना मोठा निर्णय, सर्व आरोपींवर…

| Updated on: Jan 29, 2024 | 7:56 AM

Sharad Mohol Murder | शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असताना पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आरोपींना चांगलीच जबर बसणार आहे.

शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांना मोठा निर्णय, सर्व आरोपींवर...
sharad mohol
Follow us on

अभिजित पोते, पुणे, दि.29 जानेवारी 2024 | पुणे शहरात पाच जानेवारी रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या झाली होती. या प्रकरणात पुणे पोलिसांनी १५ आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये दोन वकिलांचा समावेश आहे. या प्रकरणात साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे हे मास्टर माइंड आहे. शरद मोहोळ याचा खून करुन फरार झालेल्या आठ आरोपींना पोलिसांनी २४ तासांत अटक केली होती. मारणे आणि मोहोळ गँगच्या वादातून हा खून झाल्याची शक्यता आहे. आता पुण्यातील ही गँगवार संपवण्यासाठी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. या खून प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम एक्ट) लावण्यात आला आहे.

पुण्यातील गुन्हेगारी मोडणार

शरद मोहोळ हत्याप्रकरणी आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या 15 आरोपींसह फरार आरोपी गणेश मारणेवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस रितेश कुमार यांच्याकडून या कारवाईचे आदेश देण्यात आले होते. पुणे पोलिसांनी आता पुण्यातील गुन्हेगारी मोडण्यासाठी कठोर पावले उचलली आहे.

हे आहेत आरोपी

  • साहील उर्फ मुन्ना पोळेकर (मुख्य आरोपी)
  • नामदेव कानगुडे
  • अमित उर्फ अमर कानगुडे
  • चंद्रकांत शेळके
  • विनायक गाव्हणकर
  • विठ्ठल गांदले
  • अ‍ॅड. रवींद्र पवार (वकील)
  • अ‍ॅड. संजय उडान (वकील)
  • धनंजय मटकर (पिस्तूल पुरवणारा)
  • सतीश शेंडगे (पिस्तूल पुरवणारा)
  • नितीन खैरे
  • आदित्य गोळे

या आरोपींसह एकूण १५ जणांवर मकोका लावण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत एखाद्या गुन्हेगाराला अटकपूर्व जमीन मिळवता येत नाही. ‘मोक्का’ची कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालविला जातो.

हे सुद्धा वाचा

कोणाला लावला जातो मकोका

खून, खंडणी, दरोडा यासारख्या तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर मकोका लावला जातो. मकोका लावणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास पहिला जातो. त्यात त्याच्यावर दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्यास ही कारवाई केली जाते.

हे ही वाचा

गेम केला, मास्टरमाईंडला सांगा, शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपीला संदेश