Pune Crime | जिल्ह्यात दरोड्याचे सत्र सुरुच; पिस्तुलाचा धाक दाखवत दुकानदाराला लुटले ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आळेफाटा येथे अविनाश पटाडे यांचे इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी रात्री 10 च्या दरम्यान दुकानात चार ते पाच अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दुकानातील 15 ते 16हजाराच्या रोख रक्कम, मोबाईल, गाडीची चावी घेतली आणि ते पसार झाले.

Pune Crime | जिल्ह्यात दरोड्याचे सत्र सुरुच; पिस्तुलाचा धाक दाखवत दुकानदाराला लुटले ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 11:43 AM

पुणे – पुणे जिह्यात सराजरोसपणे चोरीच्या घटना घडताना दिसून येत आहेत. जुन्नर तालुक्यातील अनंत ग्रामीण पतसंस्थेच्या दरोड्याची घटना ताजी असतानाच  आळेफाटा येथील इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात घुसत पिस्तूलचा दाख दाखवत दरोडा घातला आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे . गृहमंत्र्यांच्या शेजारील तालुक्यात सातत्याने घडत असलेल्या या घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

अशी घडली घटना

आळेफाटा येथे अविनाश पटाडे यांचे इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी रात्री 10 च्या दरम्यान दुकानात चार ते पाच अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दुकानातील 15 ते 16हजाराच्या रोख रक्कम, मोबाईल, गाडीची चावी घेतली आणि ते पसार झाले. पिस्तुलाचा धाक दाखवून दिवस उजेडी घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 पतसंस्थेत टाकला होता दरोडा
मागील काही दिवसात चौदा नंबर येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेत दोन अज्ञात व्यक्तींनी भर दुपारी दरोडा टाकला होता. दरोडा टाकता असताना दरोडेखोरांनी पतसंस्थेतील व्यवस्थापकाला पिस्तुलाचा धाक दाखवत पैश्याची मागणी केली. मात्र तरी व्यवस्थापक बधत नसल्याचे बघून दरोडेखोरांनी व्यवस्थापकाला गोळी मारून त्याची हत्या केली. त्यानंतर पतसंस्थेतील काही लाखांची रक्कम घेऊन ते पसार झालं. संबंधित सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली होती.

पोलीस प्रशासन हतबल का?
गेल्या काही दिवसापासून तालुक्यात राजरोसपणे घडणाऱ्या दरोड्याच्या घटना घडत आहेत. सहजपणे लोक पिस्तुलाचा वापर करत सर्वसामान्य लोकांना लुटत आहेत. मात्र या गोष्टींचा पोलिसांना थांगपत्ताही लागत नाही, मग पोलीस प्रशासन काय करत आहे? असा [प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

वरळीत सिलिंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी

राज्यात स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार; सुजय विखेंची टीका, पवार, लंकेंनाही लगावला टोला

Sai Tamhankar | सई ताम्हणकरला मिळालंय मानाचं स्थान! IMDBच्या ‘टॉप 10’मध्ये अभिनेत्रीचं नाव!