दापोडीतील कब्रस्थानात गप्पा मारत बसलेले प्रेमीयुगल अन … घडला हा धक्कादायक प्रकार

| Updated on: Nov 11, 2021 | 7:07 PM

कब्रस्थानामध्ये एक जोडपं गप्पा मारत बसलं होतं. त्याचवेळी कब्रस्थानमध्ये सुरक्षेचं काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकानं हटकले व तेथून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर ते जोडपे तेथून निघून गेले. पुन्हा काही वेळा संबंधित तरुण आपल्या मित्रासोबत तिथं आला व त्यानं 'आम्हाला का हटकलं, कब्रस्तान तुझ्या बापाचं आहे का? असं म्हणत सुरक्षा रक्षक आझम खान यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

दापोडीतील कब्रस्थानात गप्पा मारत  बसलेले प्रेमीयुगल अन ... घडला हा धक्कादायक प्रकार
crime
Follow us on

पुणे- दापोडीतील कब्रस्थानामध्ये प्रियसीसोबत गप्पा मारत बसलेल्या प्रेमी युगलाला हटकल्याच्या रागातून तरुण व त्याच्या मित्रानं सुरक्षा रक्षकाला जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार अज्ञातांच्या विरोधात भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोलीत असलेल्या कब्रस्थानात बुधवारी एक जोडपं गप्पा मारत बसलं होतं. त्याचवेळी कब्रस्थानमध्ये सुरक्षेचं काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकानं हटकले व तेथून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर ते जोडपे तेथून निघून गेले. पुन्हा काही वेळा संबंधित तरुण आपल्या मित्रासोबत तिथं आला व त्यानं ‘आम्हाला का हटकलं, कब्रस्थान तुझ्या बापाचं आहे का? असं म्हणत सुरक्षा रक्षक आझम खान यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत आझम खान जखमी झाले असून त्यांच्यावर तेथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कब्रस्थान परिसरात फारसे कुणी येत नसल्यानं प्रेमी युगलाचं भेटण्याचं हे हक्काच ठिकाण झालं आहे. अनेकदा कब्रस्थानमध्ये प्रेमी युगल भेटण्याबरोबरच अश्लील चाळे करताना दिसतात. त्यातच त्यांना हटकले तर वादावादी करतात. इतकंच नव्हे तर शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्नही केला जातो. या कब्रस्थानात राजरोस पणे चालणारे प्रेमी युगालांचे चाळे थांबवण्यात यावेत. तसेच पोलिसांनीही तिथे गस्त घालावी अशी मागणीही सुरक्षा रक्षकाने केली आहे   सुरक्षा रक्षकाला झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहेत. भोसरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :

औरंगाबादध्ये ED चे छापेः व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्याविरोधात कारवाई

VIDEO: संजय राऊतांना बॉर्नविटा पिण्याची गरज; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, माथाडी कामगारांचा संप मागे; पिंपळगाव बसवंतमधील कांदा लिलाव उद्यापासून सुरू