वैष्णवी हगवणे प्रकरणातल्या निलेश चव्हाणची धक्कादायक माहिती समोर, हगवणे कुटुंबाशी ‘असा’ आहे संबंध!

वैष्णवी हगवणे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आता निलेश चव्हाण हे नाव सातत्याने येत आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणातल्या निलेश चव्हाणची धक्कादायक माहिती समोर, हगवणे कुटुंबाशी असा आहे संबंध!
nilesh chavan
| Updated on: May 25, 2025 | 6:44 PM

वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी मोठे खुलासे होत आहेत. सासरच्या जाचामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले होतो. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाळ हे निलेश चव्हाण या व्यक्तीने वैष्णवीच्या कुटुंबीयांना दिले होते. हाच निलेश चव्हाण आता चांगलाच अडचणीत सापडला आहे. तो नेमका कोण आहे? असे विचारले जात असतानाच मोठी माहिती समोर आली आहे.

निलेश चव्हाणविरोधात गुन्हा दाखल

वैष्णवी हगवणेचे नऊ महिन्यांचे बाळ काही दिवस निलेश चव्हाणकडे होते. त्या काळात बाळाचे खूप हाल झाले. हे प्रकरण समोर आल्यानंतर वैष्णवीचे बाळ तिच्या कुटुंबीयांना द्यावे, अशी मागणी केली जाऊ लागली. तसा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानंतर निलेशने हे बाळ वैष्णवीच्या आई-वडिलांकडे सोपवले होते. मात्र मधल्या काळात बाळाच्या सुरक्षेस धोका निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तो फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

निलेशविरोधात बाल न्याय कायदा 2015 मधील 75 तसेच 87 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाला बंदिस्त ठेवल्यामुळेहीत त्याच्यावर वेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या आहेत.

निलेश चव्हाण नेमका कोण आहे?

वैष्णवी हगवणे हिच्याप्रमाणेच मयुरी जगताप ही हगवणे कुटुंबाची सून आहे. मयुरीने समोर येत गेल्या काही दिवसांत हगवणे कुटंबाचे क्रूर कारनामे समोर आणले आहेत. तिनेच हा निलेश चव्हाण कोण आहे? याबाबत सांगितलं आहे. मयुरीने निलेश चव्हाणविरोधात याआधी तक्रारही दिली आहे. मयुरीच्या सांगण्यावरून निलेश हगवणे हा वैष्णवीची नणंद करिष्मा हिचा मित्र आहे.

मयुरीने नेमकं काय सांगितलं?

‘मी स्वत: निलेश चव्हाण याच्याविरोधात तक्रार दिली होती. माझ्या ऐकण्यात आलंय की निलेश चव्हाण हा करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे. माझ्या प्रत्येक भांडणात निलेश चव्हाण असायचाच. तो सगळ्या बैठका घ्यायचा आणि काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हे सांगायचा. तो मला तसेच माझ्या पतींना कायम चुकीचा ठरवत आला. करिष्माच बरोबर आहे, असं तो म्हणायचा. निलेश चव्हाणचं कर्वेनगरला ऑफिस आहे. तिथे आमच्या कायम बैठका व्हायचा, असा गौप्यस्फोट मयुरी जगतापने केला.