Pune news : अरे रे रे, महिलेने केला मुलावर अत्याचार, व्हिडिओ काढला अन्…

Pune Cirme News : पुणे शहरात अत्याचाराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा अत्याचार महिलेने एका अल्पवयीन मुलावर केला आहे. त्यानंतर त्या प्रकरणाचा व्हिडिओसुद्धा काढला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Pune news : अरे रे रे, महिलेने केला मुलावर अत्याचार, व्हिडिओ काढला अन्...
| Updated on: Aug 21, 2023 | 1:04 PM

रणजित जाधव, लोणावळा, पुणे | 21 ऑगस्ट 2023 : नेहमी पुरुषांकडून महिलेवर अत्याचार केले जात असल्याच्या बातम्या येतात. परंतु पुणे शहरातील हा प्रकार वेगळाच आहे. पुणे शहरात अत्याचाराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेने अल्पवयीन मुलावर अत्याचार केला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ त्या महिलेने काढला. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी देत शरीरिक संबंध करण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे त्या मुलाला प्रचंड धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अत्याचाराचे वेगळे प्रकरण

देशात अत्याचाराच्या प्रकारांची चर्चा होत असते. वाढत्या अत्याचारांच्या प्रकरणांमुळे नेहमी चिंता व्यक्त केली जाते. पुरुषांकडून महिलेवर अत्याचाराच्या घटना या होतात. परंतु पुण्यात महिलेकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराचा वेगळा प्रकार घडला आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्या महिलेने घराशेजारी राहणाऱ्या १७ वर्षांचा अल्पवयीन मुलास अत्याचार करायला लावला.

व्हिडिओ काढला अन् धमकी दिली

महिला अत्याचार करुन थांबली नाही. या प्रकाराचा तिने व्हिडिओ तयार केला. त्यानंतर अल्पवयीन मुलाला जबरदस्ती करत पोलिसात जाण्याची धमकी दिली. माझ्याशी शरीरिक संबंध न केल्यास हे प्रकरण पोलिसांकडे जाईल, असे सांगत तिने संबंध करायला भाग पाडले. शरीर संबंध करतानाचे व्हिडिओही मुलाला काढायला लावलेत. अखेर या प्रकरणी कोंढवा पोलिसांत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निर्भया प्रकरणानंतर अत्याचाराचा कायदा कठोर करण्यात आला. अल्पवयीन मुलाने केलेला अत्याचाराची शिक्षा वाढवण्यात आली. परंतु पुणे शहरात उलटाच प्रकार घडला आहे.