AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात खळबळ! बायकोचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो नवऱ्यापर्यंत पोहोचले, शिक्षक नवऱ्याने रात्रीत… भयंकर घटना

जर एखादा व्यक्ती आपल्यावर जीवापाड प्रेम करत असेल तर वेळ पडली तो जीव घ्यायली मागे पुढे पाहत नाही. तो जीव कोणाचाही जाऊ शकतो. पुण्यात अशीच एक घटना समोर आली आहे. बायकोचे तिच्या BF सोबतचे फोटो नवऱ्यापर्यंत पोहोचले त्यानंतर जे काही घडलं त्याने सर्वांनाच धक्का बसलाय.

पुण्यात खळबळ! बायकोचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो नवऱ्यापर्यंत पोहोचले, शिक्षक नवऱ्याने रात्रीत... भयंकर घटना
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 18, 2024 | 8:22 PM
Share

लग्नानंतर पती किंवा पत्नीचे बाहेर दुसऱ्या कोणासोबत संबंध असल्याचं समोर आल्यावर अनेक संसार मोडले आहेत. अशी अनेक प्रकरणे आपण पाहिली असतील पण पुण्यातून एख खळबळजनक घटना समोर आली आहे. पती आणि पत्नीची तीन वर्षांपासून कोर्टामध्ये घटस्फोटाची केस सुरू होती. यादरम्यान पत्नीने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो नवऱ्यापर्यंत पोहोचले. फोटो पाहताच त्याचा राग अनावर झाला त्यानंतर त्याने जे काही केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला.

नेमकं काय आहे प्रकरण?

आपल्या पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोटो पाहून पती राजीव कुमार संतापला होता. गेली तीन वर्षे घटस्फोटाची कोर्टात केस सुरू होती. तणावात असताना बायकोचे तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो त्याच्यापर्यंत पोहोचले. पती राजीव कुमार याने एक प्लॅन केला, राजीव कुमार हा बिहारमध्ये शिक्षक होता. राजीव कुमारने त्याच ठिकाणी काम करणाऱ्या बिहार येथील तरुणाला सोबत घेऊन पुणे गाठलं. पुण्यात आल्यावर त्याने पत्नीचा बॉयफ्रेंड प्रवीण कुमार महतो याचा पत्ता काढला.

प्रवीण कुमार हा त्याच्याच भावाच्या पुण्यातील बावधनमध्ये असलेल्या नर्सरीत पार्टनर म्हणून काम करत होता. आरोपी राजीव कुमारने मध्यरात्री एकच्या सुमारास झोपेत असलेल्या प्रवीण कुमार च्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. हत्या केल्यानंतर शिक्षक असलेल्या राजीव कुमारने पळ काढला. परंतु, पोलिसांनी मुंबईच्या दिशेने जात असताना त्याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी आरोपी राजीव कुमार साथीदार धीरजकुमार रमोदसिंगला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, राजीव कुमार असं आरोपीचं नाव असून तो कौटुंबिक कलहमुळे तणावात होता. पत्नी गेल्या तीन- चार वर्षांपासून सोबत राहत नव्हती. त्यांची घटस्फोसाठी कोर्टात केस सुरू आहे. अशातच पत्नीचे बॉयफ्रेंड प्रवीण कुमार सोबतचे फोटो व्हायरल होत होते. ते फोटो राजीव कुमार याच्यापर्यंत आले होते.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स