आंतरराष्ट्रीय बाईक रेसरचा संशयास्पद मृत्यू, चार वर्षांनी गूढ उकललं, हत्येप्रकरणी बायकोला अटक

सुमेरा परवेझ हिने 18 ऑगस्ट 2018 रोजी शाहगढ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली, ज्यामध्ये तिने सांगितले की तिचा पती अस्बाक मौन हा त्याचे मित्र संजय कुमार, विश्वास आणि अब्दुल साबीर यांच्यासह जैसलमेरला बाईक रॅलीमध्ये भाग घेण्यासाठी गेला होता. 16 ऑगस्ट रोजी वाळवंट भागात सरावासाठी गेलेल्या अस्बाकचा वाळवंटात उपासमार आणि तहानेने मृत्यू झाला.

आंतरराष्ट्रीय बाईक रेसरचा संशयास्पद मृत्यू, चार वर्षांनी गूढ उकललं, हत्येप्रकरणी बायकोला अटक
पतीची हत्याImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 1:19 PM

जयपूर : 2018 मध्ये राजस्थानमधील (Rajasthan Crime News) जैसलमेर येथे आयोजित इंडिया बाईक रॅलीमध्ये भाग घेण्यासाठी बंगळुरुहून आलेला आंतरराष्ट्रीय बाईक रेसर (International Bike Racer Murder) असबाक मौन याची हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या आरोपावरुन फरार असलेली अस्बाक मौनची पत्नी सुमेरा परवेझ हिला सायबर सेलच्या मदतीने बंगळुरु येथून अटक (Wife Killed Husband) करण्यात आली आहे. या प्रकरणी यापूर्वी बंगळुरुहून संजय कुमार आणि विश्वास एसडी यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

जैसलमेरचे एसपी भंवर सिंह नाथवत यांनी सांगितले की, सुमेरा परवेझ ही मूळची केरळची रहिवासी आहे. मात्र त्यावेळी ती बंगळुरु येथे राहत होती. सुमेरा परवेझ हिने 18 ऑगस्ट 2018 रोजी शाहगढ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली, ज्यामध्ये तिने सांगितले की तिचा पती अस्बाक मौन हा त्याचे मित्र संजय कुमार, विश्वास आणि अब्दुल साबीर यांच्यासह जैसलमेरला बाईक रॅलीमध्ये भाग घेण्यासाठी गेला होता. 16 ऑगस्ट रोजी वाळवंट भागात सरावासाठी गेलेल्या अस्बाकचा वाळवंटात उपासमार आणि तहानेने मृत्यू झाला. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला.

आई-भावाला मृत्यूविषयी शंका

दुसरीकडे, मृत अस्बाक मौनची आई आणि भावाने त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करून फिर्याद दिली. त्याचवेळी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी अस्बाकचा मृत्यू मानेला मार लागल्याने झाल्याचे सांगितले. पोलिसांनी कसून तपास केला असता हा खून असल्याचे निष्पन्न झाले. घटनेच्या 3 वर्षांनंतर, 2021 मध्ये, पोलिसांनी घटनेचा खुलासा केला आणि मृताचे दोन मित्र संजय कुमार आणि विश्वास एसडी यांना अटक केली. त्याच वेळी मृताची पत्नी फरार झाली होती

हे सुद्धा वाचा

पत्नीला बंगळुरुत अटक

सुमेरा परवेझ आणि अब्दुल साबीर यांच्या विरुद्ध सीआरपीसी 299 अंतर्गत न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले, त्यांच्या शोधासाठी अनेक वेळा पथके पाठवण्यात आली, मात्र यश मिळाले नाही. एसपी भंवर सिंह यांनी एक नवीन टीम तयार केली आणि सायबर सेलचे प्रभारी भीमराव सिंग यांना बंगळुरुला पाठवले. त्यांनी सुमेराला 13 मे रोजी बंगळुरु येथून अटक केली. सुमैराला न्यायालयात हजर करून कोठडीत चौकशी करण्यात येत आहे

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.