वडिलांच्या अपमानाचा सूड, 13 वर्षांच्या मुलाकडून एक वर्षाच्या चिमुरडीची हत्या

वडिलांच्या अपमानाचा सूड, 13 वर्षांच्या मुलाकडून एक वर्षाच्या चिमुरडीची हत्या
चिमुरडीची हत्या
Image Credit source: टीव्ही 9

पोलिसांनी पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढून शव विच्छेदनासाठी पाठवला आणि संपूर्ण प्रकरणाचा तासभर तपास केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने या निष्पाप मुलीची हत्या केली होती.

अनिश बेंद्रे

|

May 15, 2022 | 2:47 PM

लखनौ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime News) लखनौच्या सैरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक वर्षाच्या निष्पाप मुलीची हत्या (Child Murder) झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. 13 वर्षीय मुलाला आपल्या वडिलांच्या झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळेच त्याने फिल्मी स्टाईलमध्ये मुलीची हत्या करुन तिला शाळेतील पाण्याच्या टाकीत टाकल्याचे समोर आले आहे. मुलीचा मृतदेह वर येऊ नये म्हणून आरोपी मुलाने तिच्या पायाला वीट बांधली होती.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, सैरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जुगौर गावात सुशील पांडे यांची 1 वर्षाची मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर सुशीलने पोलिसांत तक्रार दिली. मुलीच्या शोधासाठी मोहीम सुरु करण्यात आली. तपासादरम्यान दोन अल्पवयीन मुले चिमुकलीला शाळेच्या दिशेने घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शाळेत झडती घेतली असता शौचालयातील पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह पडलेला आढळून आला. मुलीचा पाय विटेने बांधलेला होता, तर तिच्या अंगावर कपडे नव्हते.

पाण्याच्या टाकीत मृतदेह

पोलिसांनी पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढून शव विच्छेदनासाठी पाठवला आणि संपूर्ण प्रकरणाचा तासभर तपास केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने या निष्पाप मुलीची हत्या केली होती.

हे सुद्धा वाचा

वडिलांच्या अपमानाचा सूड

वडिलांचा अपमान केल्याचा सूड उगवण्यासाठी मुलाने हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खून करणारा अल्पवयीन मुलगा ड्रग्जच्या आहारी गेलेला आहे आणि तो अनेकदा लोकांना त्रास देत असतो. त्याच्या कुटुंबीयांकडेही अनेकदा तक्रारी केल्या आहेत. उत्तर विभागाचे डीसीपी एस चिनप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपी अल्पवयीन मुलाने मुलीची हत्या केली. सध्या त्याची चौकशी सुरू असून लवकरच त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें