पगार 25 लाख, तरी काढायची अश्लील व्हिडीओ, जैसलमेरच्या व्हायरल गर्लचे धक्कादायक कांड समोर; कशी पकडली गेली?

राजस्थानच्या जैसलमेरमधील व्हायरल झालेल्या व्हिडीओतील तरुणीबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

पगार 25 लाख, तरी काढायची अश्लील व्हिडीओ, जैसलमेरच्या व्हायरल गर्लचे धक्कादायक कांड समोर; कशी पकडली गेली?
jaisalmer viral girl (फोटो सौजन्य- एक्स, मेटा एआय)
| Updated on: Jun 02, 2025 | 8:28 PM

Jaisalmer Girl Viral Video : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एक तरुणी राजस्थानमधील एका व्यक्तीसोबत अश्लील पद्धतीने बोलत होती. तसेच या व्यक्तीसमोर नग्न होऊन ती बोलताना दिसत होती. हा व्हिडीओ मूळचा जैसलमेर येथील असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता याच व्हिडीओमधील तरुणीला पोलिसांनी अटक केली असून तिच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

25 लाखांचं होत पॅकेज पण…

मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी मूळची उत्तर प्रदेशाथील ललितपूर येथील रहिवासी आहे. तिने उत्तर प्रदेशमधील एका नामांकित महाविद्यालयातून बी. टेकची पदवी घेतलेली आहे. विशेष म्हणजे तिला चांगली नोकरीही होती. ती नोएडातील एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होती. तिला वर्षाला तब्बल 25 लाख रुपये पगार होता, अशीही माहिती समोर आली आहे.

बिहारच्या तरुणाच्या प्रेमात पडली, अन् सुरुवात झाली

जैसलमेरमधील एका ज्येष्ठ व्यक्तीसोबत अश्लील व्हिडीओ तयार केल्यानंतर ही तरुणी तसेच तिचा बॉयफ्रेंड यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जैसलमेर पोलिसांनी या दोघांनीही नोएडामधील एका फ्लॅटमधून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव स्मृती जैन आहे. सॉफ्टवेअर कंपनीत काम करताना ही तरुणी बिहारमधील वैशाली येथील तरुण शानू कुमार याच्या संपर्कात आली आणि त्याच्या प्रेमात पडली. नंतर दोघेही लिव्ह-इनमध्ये राहात होते. आलिशान आयुष्य जगता यावं यासाठी तिने अशा प्रकारचे अश्लील व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली होती.

व्हिडीओ तयार करायला नेमकी सुरुवात कुठून झाली?

तीन वर्षांपूर्वी अटक केलेले दोघेही थायलंडच्या ट्रिपवर गेले होते. तेथे तिने वेगवेगळ्या पुरुषांसोबत अशाच प्रकारचे कृत्य केले होते. तिच्या बॉयफ्रेंडने हा सर्व प्रकार आपल्या हिडन कॅमेऱ्यात कैद केला होता. त्यानंतर चेहरा ब्लर करून हे व्हिडीओ एका विदेशी संकेतस्थळाला विकला होता. यातून त्यांना काही लाख रुपये मिळाले. त्यानंतर त्यांनी नोएडाच्या फ्लॅटमध्ये अश्लील व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. हे व्हिडीओ ते परदेशी संकेतस्थळांना विकू लागले. असाच एक व्हिडिओ त्यांचा चांगलाच पाहिला गेला. त्यानंतर ते दिल्ली, नोएडा अशा भागात जाऊन मोकळ्या मैदानात व्हिडीओ शूट करू लागले.

हे व्हिडीओ अपलोड करताना ते तरुणीचा चेहरा ब्लर करायचे. तसेच आवाजही बदलायचे. सोबतच वेगवेगळे डिजिटल फिल्टर वापरून ते हे व्हिडिओ विकायचे. त्यांनी राजस्थानच्या 10 पेक्षा जास्त शहरांत असे व्हिडीओ तयार करण्याचा विचार केला होता. पण त्याआधीच त्यांचे बिंग फुटले.