आई लग्नात, तर मुलगा कामावर; संधी साधून घर फोडलं आणि..

घरफोडीच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरात कुणी नसल्याची संधी साधन अनेकदा चोरटे घर फोडून लूटमार करतात. अशीच एक घटना गोंदियामध्येही घडली आहे. घरातील महिला लग्नासाठी बाहेर गेली आणि तिचा मुलगा कामावर गेला.

आई लग्नात, तर मुलगा कामावर; संधी साधून घर फोडलं आणि..
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 8:24 AM

घरफोडीच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरात कुणी नसल्याची संधी साधन अनेकदा चोरटे घर फोडून लूटमार करतात. अशीच एक घटना गोंदियामध्येही घडली आहे. घरातील महिला लग्नासाठी बाहेर गेली आणि तिचा मुलगा कामावर गेला. तीच संधी साधून चोर घराचं कुलूप फोडून आत घुसला आणि लाखो रुपयांचा ऐवज पळवला. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम झालिया येथे ही घटना घडली. फिर्यादी महिला घरी आल्यावर तिला घराच कुलूप तुटलेलं दिसलं, आत गेल्यावर अस्ताव्यस्त घर पाहून तिला शंका आली. नीट पाहणी केली असता, लाखोंचा ऐवज गायब झाल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी सालेकसा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस गुन्हेगार चोरट्यांचा शोध घेत आहेत.

घरावर पाळत ठेवली आणि डाव साधला

मिळालेल्या माहितीनुसार, रमशिला कुमारसिंह मच्छीरके (45) असे फिर्यादी महिलेचे नाव असून गोंदियया जिल्ह्यातील ग्राम झालिया येथे त्या राहतात. घटनेच्या दिवशी त्या गावातच असलेल्या लग्न समारंभात गेल्या होत्या. तर त्यांचा मुलगा हा लग्नाच्या बुकिंगसाठी कार घेऊन गेला होता. त्यांच्या घरात दुसरं कोणीच नव्हतं. हीच संधू साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले आणि ते आत घुसले. त्यानंतर चोराने पूजा घरात ठेवलेल्या अलमारीतून सुमारे 6 लाख रुपयांचा ऐवज लंपास करत पोबारा केला.

त्यामध्ये 1 लाख 2 हजार रुपये रोख, 40 ग्रॅम वजनाचा 2 लाखांचा सोन्याचा हार, 15 ग्रॅमचा 75 हजार रुपये सोन्याचा हार , 10 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या (किंमत 50 हजार रुपये), 10 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 2 नथ (किंमत 50 हजार रुपये), 75 तोळ्याचे कर्दन (किंमत 54 हजार रुपये), 50 तोळे वजनाचे चांदीचे कर्दन (किंमत 35 हजार रुपये), 20 तोळे वजनाच्या चांदीचे पैंजण ( किंमत 18 हजार रुपये) असा एकूण 6 लाख 2 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी झाला आहे. या घटनेसंदर्भात रमशीला मच्छीरके यांनी सालेकसा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम 457,380 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.