सांगलीत हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, पोलीस निरीक्षकालाच बेड्या, दोघींची सुटका

वेश्या अड्ड्यावरील छाप्यात पोलिस निरीक्षकाला अटक झाल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Sangli Hotel Prostitution Racket )

सांगलीत हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, पोलीस निरीक्षकालाच बेड्या, दोघींची सुटका
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 10:04 AM

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकालाच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सांगली शहराजवळील कर्नाळ रोड येथील हॉटेल रणवीरमध्ये सुरु असलेला हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. एका पोलिस निरीक्षकासह 6 जणांना अटक करण्यात आली. तर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sangli Hotel Raid High Profile Prostitution Racket busted PI arrested)

आटपाडीच्या पोलीस निरीक्षकाला बेड्या

सांगली जिल्ह्यात कर्नाळ रोडवरील ‘हॉटेल रणवीर’वर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, हॉटेल मालक, एजंट यांचाही समावेश आहे. हॉटेलमधील छापेमारीत दोन तरुणीही सापडल्या. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

दोन महिलांची सुटका

आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण देवकर, हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादर, शिवाजी वाघले, सत्यजित पंडित अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दोन महिलांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे. वेश्या अड्ड्यावर पोलिस निरीक्षकाला अटक झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पिटा (अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक) कायद्यानुसार हॉटेलवर कारवाई करण्यात आली. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

मुंबईत इव्हेंट मॅनेजरसह तिघांना अटक

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेकडून दोन कास्टिंग डायरेक्टरसह एका इव्हेंट मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. 14 वर्षांच्या मुलीला मॉडेलिंगचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात आणल्याचा आरोप दोघांवर आहे. अंधेरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Sangli Hotel Raid High Profile Prostitution Racket busted PI arrested)

लॉकडाऊनमध्ये डान्सबारवर कारवाई

लॉकडाऊनमध्ये सुरु असलेल्या डान्स बारवर मुंबई पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात धाड टाकली होती. त्यावेळी 15 ग्राहकांसह 20 जणांना अटक करण्यात आली होती. गोरेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत बारमधील तळ घरातून 11 तरुणींची सुटकाही केली होती.

संबंधित बातम्या :

मॉडेलिंगचे अमिष दाखवून 14 वर्षीय मुलगी वेश्या व्यवसायात आणल्याचा आरोप, इव्हेंट मॅनेजरसह 2 कास्टिंग डायरेक्टरला अटक

लॉकडाऊनमध्ये रात्री उशिरापर्यंत डान्सबार सुरु, पोलिसांचा छापा, तळघरातून 11 मुलींची सुटका

(Sangli Hotel Raid High Profile Prostitution Racket busted PI arrested)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.