Accident Satara | राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे गावच्या हद्दीत भीषण अपघात, दोन ठार तर चार जखमी

साळुंखे कुटुंबीय मुंबईहून आपल्या ढेबेवाडी या गावी जात असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. नागठाणे चौकात आणि रस्त्याच्या कडेला वाहने लावली जातात त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत.

Accident Satara | राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे गावच्या हद्दीत भीषण अपघात, दोन ठार तर चार जखमी
| Edited By: | Updated on: Aug 03, 2022 | 12:57 PM

सातारा : साताऱ्यात (Satara) नागठाणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील चौकात पहाटे 6 च्या सुमारास भीषण अपघात झालायं. वॅगनार गाडीने थांबलेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जातयं. या अपघातात नाना साळुंखे आणि लक्ष्मी साळुंखे या जोडप्याचा मृत्यू (Death) झाला असून मुलगी माधुरी साळुंखेसह 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मच्छिंद्र जाधव वय 40, तनुजा जाधव वय 35 आणि कनिष्क जाधव वय 4 हे या अपघातात गंभीर जखमी झालेयं.

अपघातात नाना साळुंखे आणि लक्ष्मी साळुंखे या जोडप्याचा मृत्यू

साळुंखे कुटुंबीय मुंबईहून आपल्या ढेबेवाडी या गावी जात असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. नागठाणे चौकात आणि रस्त्याच्या कडेला वाहने लावली जातात त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. या ठिकाणी नेहमी वर्दळ असल्या कारणाने या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जातयं.

अपघाताची माहिती बोरगाव पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल

या अपघाताची माहिती बोरगाव पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आलीयं. या अपघातामध्ये मच्छिंद्र जाधव, तनुजा जाधव आणि कनिष्क जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. साळुंखे आणि जाधव कुटुंबिय हे मुंबईहून आपल्या गावाकडे निघाले होते.