
जावळी : काल एक भयानक घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण सातारा (SATARA NEWS) जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सातारा जिल्ह्यातील जावळा तालुक्यातील (JAWLA) एकीव गावात काल दोन ग्रुप तिथं पर्यटनासाठी आले होते अशी माहिती मिळाली आहे. त्यावेळी त्या दोन ग्रुपमध्ये मारामारी झाली, घटना स्थळी झालेल्या झटापटीत धबधब्याच्या बाजूला असलेल्या दरीत दोन तरुण पडले. त्यानंतर दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती पोलिसांना (SATARA CRIME NEWS) समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर त्या तरुणांने मृतदेह पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने आणि एका रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढले.
JAWLA WATERFALL
सातारा जिल्ह्यात मागच्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी धबधबे प्रवाहीत झाले आहेत. काल गटारी असल्यामुळे पर्यटन ठिकाणी लोकांनी अधिक गर्दी केली होती. एकीव धबधब्यावर सुध्दा रविवारी सकाळपासून गटारी साजरी करण्यासाठी अधिक गर्दी होती.
JAWLA WATERFALL
सातारा जिल्ह्यातील दोन ग्रुप सुद्धा तिथं आले होते. सायंकाळच्या दरम्यान दोन्ही गटात वादावादी झाली. त्यावेळी त्यातले दोन तरुण बाजूला असलेल्या दरीत कोसळले. विशेष म्हणजे साडसातशे फूट दरी असल्यामुळे त्या तरुणांचा जागीचं मृत्यू झाला आहे.
JAWLA WATERFALL
अक्षय शामराव आंबवणे आणि गणेश फडतरे अशी मृत दोघांची नावं आहेत. ज्यावेळी तरुणांचा वाद झाला त्यावेळी या दोघांना ढकलून दिले असावे अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे.
JAWLA WATERFALL
या घटनेची माहिती मिळताचं पोलिस, स्थानिक आणि एक रेस्क्यू पथकाने रात्री उशिरा त्या तरुणांचा शोध घेतला. ज्यावेळी सगळे त्या तरुणांचा शोध घेत होते. त्यावेळी मुसळधार पाऊस असल्यामुळे अनेकदा व्यत्यय येत होता. कित्येक तासांच्या शोध मोहिमेनंतर दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले आहेत. दोन्ही तरुणांना अधिक मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद सातारा जिल्ह्यातील मेढा जिल्ह्यात करण्यात आली आहे.