AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याने 5 रुपये मागितले, दुकानदाराने 2 रुपये दिले; मग तृतीयपंथीयाने वाद घातला अन् दुकानदाराला संताप अनावर झाला !

एक तृतीयपंथी नारळपाणीवाल्याच्या दुकानात आली आणि पैशाची मागणी करु लागली. तृतीयपंथीयाने 5 रुपये मागितले, पण दुकानदाराने 2 रुपयेच दिले. यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला.

त्याने 5 रुपये मागितले, दुकानदाराने 2 रुपये दिले; मग तृतीयपंथीयाने वाद घातला अन् दुकानदाराला संताप अनावर झाला !
पैशांच्या वादातून दुकानदाराकडून तृतीयपंथीयावर हल्लाImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 18, 2023 | 2:42 PM
Share

मुंबई / गोविंद ठाकूर : पैशावरुन वाद घातला म्हणून दुकानदाराने तृतीयपंथीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना कांदिवली येथे घडली. याप्रकरणी आरोपी दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. भागवत प्रद्युम्न चौहान असे अटक करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव आहे. जखमी तृतीयपंथीयाला नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. हल्ला केल्यानंतर आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेला. कांदिवली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील आझमगड येथून दुकानदाराला बेड्या ठोकल्या आहेत. कांदिवली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

दुकानदाराने जास्त पैसे दिले नाहीत म्हणून वाद घातला

कांदिवली पश्चिम लालजी पाडा 90 फूट रोडवर भागवत चौहाने याचे नारळपाणीचे दुकान आहे. मालवणी येथील रहिवासी तृतीयपंथी रीना शेख ही दुकानदारांकडून पैसे मागत होती. तिने चौहान याच्याकडे 5 रुपये मागितले, पण दुकानदाराने केवळ 2 रुपये दिले. यावरुन तृतीयपंथी रीनाने चौहानसोबत वाद घालण्यास आणि टाळ्या वाजवण्यास सुरवात केली.

वादातून दुकानदाराकडून तृतीयपंथीवर हल्ला

या वादामुळे संतप्त झालेल्या दुकान मालकाने रीनावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तृतीयपंथीच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर स्थानिक लोकांनी तृतीयपंथीला जवळच्या ऑस्कर रुग्णालयात दाखल केले. मात्र तृतीयपंथीयाची प्रकृती गंभीर असल्याने तिला केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.

तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला यूपीतून अटक

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी उत्तर प्रदेशातील आझमगड येथे त्याच्या मामाच्या घरी असल्याचे कळले. पोलिसांनी अनेक पथके तयार करून आरोपी भागवत प्रद्युमन चौहान याला देवगाव आझमगड उत्तर प्रदेश येथून अटक केली. पुढील तपास कांदिवली पोलीस करत आहेत.

Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित