Sidhu Moose Wala : 23 जखमा, 15 मिनिटांत मृत्यू! सिद्धू मुसेवालाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

| Updated on: Jun 03, 2022 | 10:35 AM

Sidhu moose wala death : सिद्धू मुसेवाला याची अज्ञातांनी गोळीबार करत हत्या केली होती. या हत्येनंतर काही काळ जीपमध्येच रक्ताच्या थारोळ्यात सिद्धू मुसेवाला यांचा मृतदेह पडून होते.

Sidhu Moose Wala : 23 जखमा, 15 मिनिटांत मृत्यू! सिद्धू मुसेवालाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसवाला
Image Credit source: tv9
Follow us on

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर त्याच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टकडे (Sidhu Moose Wala Post-mortem Report) सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर सिद्धू मुसेवालाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे करण्यात आलेत. गोळीबारात सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala Murder) शरीरावर एकूण 19 जखमा झाल्या होत्या. तसंच गोळीबार झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत सिद्धू मुलेवाला याचा जीव गेला असल्याचंही पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलंय. 29 मे रोजी सिद्धू मुसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडालेली. सिद्धूच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटकही केली आहे. याप्रकरणी अजूनही पोलीस तपास सुरु असून पंजाबचं राजकारणही तापलंय. तसंच पंजाबमधील (Punjab News) गँगवॉरही पुन्हा एकदा छेडलं जाण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये काय?

  1. मुसेवालाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये 19 गोळ्या त्याच्या शरीराच्या आरपार गेल्याचं समोरं
  2. मुसेवालाच्या शरीरावर एकूण 23 जखमा
  3. यकृत, किडनी आणि पाठीच्या कण्याला गोळी भेदल्याचे निशाण
  4. 14 ते 15 गोळ्या शरीराच्या पुढील तर चीन ते चार गोळ्या उज्या हाताच्या कोपरावर लागलेल्याचं समोर
  5. हे सुद्धा वाचा
  6. शरीरावर तब्बल तीन ते पाच सेंटीमीटपर्यतच्या जखमा

सुरक्षेवरुन राजकारण तापलं…

सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर पंजाबचं राजकारण तापलंय. व्हीआयपी सुरक्षा भगवंत मान यांनी काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 48 तासांच्या आतच सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर आता पुन्हा एकदा पंजाबमध्ये व्हीआयपी सुरक्षा देण्यात येणार असल्याचं पंजाब सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.

कुणी केली हत्या?

सिद्धू मुसेवाला याची अज्ञातांनी गोळीबार करत हत्या केली होती. या हत्येनंतर काही काळ जीपमध्येच रक्ताच्या थारोळ्यात सिद्धू मुसेवाला यांचा मृतदेह पडून होते. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई याने सिद्धूच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याला पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं असून अधिक तपास केला जातोय.

कोण आहे सिद्धू मुसेवाला?

सिद्धू मुसेवाला एक प्रसिद्ध पंजाबी गायक आहे. पंजाब विधानसभा निवडणुकृही लढवली होती. काँग्रेसच्या तिकीटवर ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पंजाबमधील मानसा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. ट्रॅक्टरवर गाणी शूट करण्यासाठी मुसावाला ओळखले जायचे. पंजाबमध्ये मोठा चाहता वर्ग मुसावाला यांचा होता. सहा महिन्यांनी मुसावाला लग्न करणार होते. पण त्याआधीच जीपमधून जात असताना मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.