AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूआधी लॉजवर वेगळच कांड? नृत्यांगना दिपालीच्या पाठोपाठ तो ही लॉजवर… पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

जामखेड येथील लॉजवर नृत्यांगना दिपाली पाटील हिने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर राज्यात खळबळ माजली आहे. आता या प्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे.

मृत्यूआधी लॉजवर वेगळच कांड? नृत्यांगना दिपालीच्या पाठोपाठ तो ही लॉजवर... पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
Deepali PatilImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 06, 2025 | 7:17 PM
Share

नृत्यांगना दिपाली पाटीलने जामखेड येथील साई लॉजवर गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी दिपालीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर भाजपचा माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाडला पोलिसांनी अटक केली आहे. दिपालीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. दिपाली लॉजवर पोहोचली त्यानंतर काय घडले हे समोर आले आहे.

नवी माहिती काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास दिपाली पाटील साई लॉजवर पोहोचली होती. तिच्या पाठोपाठ संदीप गायकवाड हा देखील त्या लॉजवर पोहोचला होता. तो दिपालीच्या रुममध्ये जात असल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. दिपालीने आत्महत्या करण्यापूर्वी संदीप देखील त्या लॉजवर पोहोचला होता. त्या दोघांमध्ये नेमकं काय झालं? याबाबत माहिती समोर आलेली नाही. पण, संदीपने दिपालीला काही त्रास तर दिला नाही ना? याचा तपास पोलीस अधिकारी घेत आहेत.

कुटुंबियांनी केली तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड पोलीस ठाण्यात संदीप सुरेश गायकवाड याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (कलम BNS १०८ अन्वये, गु.र.नं. ६४८/२०२५). दिपालीचे आई-वडील तसेच नातेवाईक हे कल्याण (जि. ठाणे) येथील रहिवासी आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दिपालीचा मृतदेह पुढील विधींसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, तिचे अंत्यसंस्कार कल्याण येथे होणार आहेत. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

दिपाली ही मुळची कल्याण येथील रहिवासी असून ती काही मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती घराबाहेर पडली होती. परंतु काही तास उलटून गेल्यावरही ती परत न आल्याने मैत्रिणींनी तिला शोधायला सुरुवात केली. दिपाली ज्या रिक्षाने लॉजवर गेली होती त्या रिक्षा चालकाची चौकशी केली असता ती लॉजवर असल्याचे समोर आले. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ