रात्री मच्छर मारणारी कॉईल लावून झोपले, मात्र सकाळी उठलेच नाही; कुटुंबासोबत नेमके काय घडले?

| Updated on: Mar 31, 2023 | 1:12 PM

मच्छरचा त्रास रोखण्यासाठी सर्व कुटुंबीय रात्री मच्छरची कॉईल लावून झोपी गेले. मात्र ही रात्र कुटुंबाची अखेरची ठरली. रात्रीत जे घडले त्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

रात्री मच्छर मारणारी कॉईल लावून झोपले, मात्र सकाळी उठलेच नाही; कुटुंबासोबत नेमके काय घडले?
मच्छर कॉईलमुळे आग लागून एकचा कुटुंबातील सहा जणांचा मृ्त्यू
Image Credit source: Google
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. मच्छरचा त्रास रोखण्यासाठी रात्री कुटुंबीय मच्छरची कॉईल लावून झोपले. मात्र ती रात्र कुटुंबाची अखेरची ठरली. कुटुंब रात्री झोपेत असतानाच कॉईल गादीवर पडली आणि आग लागली. या आगीमुळे घरभर धूर पसरला. या आगीत जळून आणि धुरामुळे घुसमटून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर आहेत. दोघावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

दिल्लीतील शास्त्रीनगर परिसरातील मच्छी मार्केटमध्ये एक कुटुंब नेहमीप्रमाणे रात्री जेवण करुन झोपले. परिसरात मच्छरचा उपद्रव झाल्याने मच्छरपासून सुटका करण्यासाठी रात्री त्यांनी मच्छरची कॉईल लावली होती. मात्र मध्यरात्री ही कॉईल कुटुंबीयांच्या गादीवर पडली आणि आग लागली. यामुळे घरात विषारी गॅस पसरल्याने आधी सर्व जण बेशुद्ध झाले. यानंतर श्वास गुदमरुन घरातील सहा सदस्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये दीड महिन्यांच्या बाळाचाही समावेश

मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि दीड महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. आगीत होरपळून अन्य दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 22 वर्षाच्या तरुणावर प्राथमिक उपचार करुन त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञ काय म्हणातात?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, डासांपासून बचाव करणाऱ्या कॉईलमध्ये डीडीटी, इतर कार्बन फॉस्फरस आणि घातक पदार्थ असतात. कॉईल पेटवून बंद खोलीत झोपल्याने खोलीतील गॅस बाहेर जात नाही. कॉईल जळत राहिल्याने कार्बन मोनोऑक्साइड संपूर्ण खोलीत भरतो. खोलीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले की, हळूहळू कार्बन मोनॉक्साईड व्यक्तीच्या शरीरात भरते, ज्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होतो आणि गुदमरल्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो.