CRIME NEWS : ‘दाजी का म्हणत नाही’, केबल वायरने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

एका व्यक्तीला काही लोकांनी जोरदार मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. नेमकी मारहाण का केली. त्यांच्यामागे कारण काय आहे याचा तपास पोलिस करीत आहेत.

CRIME NEWS : दाजी का म्हणत नाही, केबल वायरने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल
Solapur crime news in marathi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 25, 2023 | 7:59 AM

सोलापूर : ‘दाजी’ का म्हणत नाही, या कारणावरुन पाच जणांनी एकास लोखंडी गजाने बेदम मारहाण केली आहे. त्यांनी इतकी जोरात मारहाण केली आहे की, मारहाण करीत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामुळे संपालेल्या लोकांनी सगळ्यांना शिक्षा व्हायला हवी अशी भूमिका घेतली आहे. टेभुर्णी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून त्या पाच व्यक्तींचा पोलिसांनी (SOLAPUR POLICE) शोध घ्यायला सुरुवात केली आहे, गावातील पाच लोकांनी मारहाण केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मारहाण झालेली व्यक्ती गंभीर जखमी झालेली असून त्याचा व्हिडीओ (Solapur crime news in marathi) समोर आला आहे.

Solapur crime news in marathi

दाजी का म्हणत नाही, या कारणावरुन परिते गावातील एकास लोखंडी गज केबल वायरने ५ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या परिते तुळशी मार्गावर घडली. या प्रकरणी टेभुर्णी पोलिसांत ५ जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद झाला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. मारहाणीत विकास मुसळे यांना गंभीर दुखापत झाली असून मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ज्या पाच व्यक्तींना मारहाण केली आहे, त्यांनी नेमकी मारहाण का केली आहे ? याचा पोलिस शोध घेणार आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत मारहाण करीत असलेले पाचजण स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळं त्यांना ताब्यात घेणं सोप्प जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्या व्यक्तींना ताब्यात घेतल्यानंतर खरं कारण उजेडात येईल.

ज्यांनी मारहाणीचा व्हिडीओ पाहिला आहे ? त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.