AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Praful Patel : पवार कुटुंबात किती दिवसाचा दुखवटा असतो? प्रफुल्ल पटेलांनी काय उत्तर दिलं?

Praful Patel : "आम्ही भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आहोत. “दादा असल्यापासून आम्ही एनडीएमध्ये आहोत. म्हणजे भाजपसोबत सत्तेत आहोत. या निर्णयाला जे अनुकूल आहेत, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे”

Praful Patel : पवार कुटुंबात किती दिवसाचा दुखवटा असतो? प्रफुल्ल पटेलांनी काय उत्तर दिलं?
Praful Patel
| Updated on: Feb 03, 2026 | 2:25 PM
Share

मागच्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. बारामती येथे ते सभेसाठी प्रायवेट चार्टर्ड विमानाने चालले होते. त्यावेळी सकाळी पावणे नऊच्या सुमारास बारामती विमानतळाजवळ त्यांचं विमान कोसळलं. या अपघातात विमानातील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला. मागच्या बुधवारी 28 जानेवारीला त्यांचं निधन झालं. त्यानंतर तीनच दिवसांनी 31 जानेवारीला अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावरुन सुनेत्रा पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाटिप्पणी सुरु आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी समोर येऊन त्या सर्व प्रश्नांना उत्तर दिलं.

पतीच्या निधनाला दहादिवसही झालेले नसताना शपथविधीची इतकी घाई कशाला? तेराव्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेता आली असती? मंत्रीपद कुठे पळून जात होतं का? अशा प्रकारच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त झाल्या. सुनेत्रा पवार यांना लक्ष्य करण्यात आलं. त्यावर प्रफुल्ल पटेल आज बोलले आहेत. “पवार कुटुंबात तीन दिवसांचा शोक असतो. पवार कुटुंबात तीन दिवसांचा शोक असतो असं सुनेत्रा पवारांनी सांगितलं” असं प्रफुल्ल पटेल बाजू सावरताना म्हणाले. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्याच दिवशी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला.

दादा असल्यापासून आम्ही एनडीएमध्ये

शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना गौप्यस्फोट केला की, अजित पवारांशी चर्चा झाली होती. 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार होतं. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. अखेर काल सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं की, आम्ही भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आहोत. “दादा असल्यापासून आम्ही एनडीएमध्ये आहोत. म्हणजे भाजपसोबत सत्तेत आहोत. या निर्णयाला जे अनुकूल आहेत, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे”

तुमच्या पोटात का दुखतय?

प्रफुल्ल पटेल यांनी मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही हे ही स्पष्टपणे सांगितलं. राज ठाकरे आणि आमच्या पक्षाचा काही संबंध नाही असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मराठी असावा अशी राज ठाकरे यांची भूमिका होती. त्यावर प्रफुल्ल पटेल बोलले. “कुणी म्हणतय घाई केली, तुमच्या पोटात का दुखतय? दादांच्या निधनानंतर पक्षाशी संबंध नसणार उलट सुलट बोलत आहेत. एनसीपीचा विधिमंडळ नेता कुणाला निवडावा हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे” असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी